'मुंज्या' नंतर Vampires वर सिनेमा आणणार दिनेश विजान, रश्मिका मंदाना हिरोईन तर हिरो...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 04:03 PM2024-06-26T16:03:38+5:302024-06-26T16:05:38+5:30

'स्त्री', 'मुंज्या', 'भेडिया' नंतर आता येणार Vampire!

dinesh vijan next movie will be on vampires Rashmika Mandanna and Ayushmann Khurrana in lead roles | 'मुंज्या' नंतर Vampires वर सिनेमा आणणार दिनेश विजान, रश्मिका मंदाना हिरोईन तर हिरो...

'मुंज्या' नंतर Vampires वर सिनेमा आणणार दिनेश विजान, रश्मिका मंदाना हिरोईन तर हिरो...

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि दिनेश विजान निर्मित नुकताच रिलीज झालेला 'मुंज्या' सिनेमा सुपरहिट झाला. हॉरर कॉमेडी सिनेमाने प्रेक्षकांना घाबरवलंही आणि हसवलंही. आता ही जोडी आणखी एक धमाका करण्याच्या तयारित आहे. व्हॅम्पायर्सवर (Vampires)सिनेमा आणण्याची त्यांची योजना आहे. तसंच यामध्ये फ्रेश जोडी पाहायला मिळू शकते. 

दिनेश विजान यांची हॉरर कॉमेडी ही खासियतच आहे. आधी 'स्त्री' आणि आता 'मुंज्या' या सिनेमांमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये जान आणली. 'भेडिया' हा सुद्धा त्यांनी आणलेला वेगळ्या धाटणीचा सिनेमा. आता आगामी vampires वर आधारित सिनेमाही याच हॉरर कॉमेडीचा भाग असणार आहे. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, या सिनेमाचं टायटल 'व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर' असणार आहे. आयुष्मान खुराना (Ayushmaan Khurana) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही फ्रेश जोडी सिनेमात बघायला मिळू शकते. आयुष्मान खुरानाने याआधी दिनेश विजान यांच्या 'बाला' सिनेमात काम केलं होतं. सिनेमाच्या प्लॉटवर बरेच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यावर्षीच्या शेवटी मेकर्सला सिनेमाचं शूट सुरु करायचं आहे. 

दिनेश विजान यांनी 2018 साली 'स्त्री' सिनेमापासून सुरुवात केली.  ६ वर्षांनंतर 'स्त्री 2' प्रदर्शित होणार आहे. सध्या त्यांचं 'व्हॅम्पायर ऑफ विजय नगर' च्या स्क्रीप्टवर काम सुरु आहे. लवकरच याच्या प्री प्रोडक्शनला सुरुवात होईल. नोव्हेंबर पर्यंत शूटिंगला सुरुवात होणार आहे. 

आयुष्मान खुराना करण जोहरच्या एका स्पाय थ्रिलर सिनेमातही दिसणार आहे. शिवाय 'बॉर्डर 2' मध्येही तो झळकणार आहे. तर रश्मिका 'पुष्पा 2' मध्ये श्रीवल्ली बनून परत येत आहे. 

Web Title: dinesh vijan next movie will be on vampires Rashmika Mandanna and Ayushmann Khurrana in lead roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.