पहिल्या प्रेग्नंन्सीनंतर पुन्हा बेबी प्लॅन करत आहेत दीपिका-शोएब; म्हणाले- "अल्लाहच्या मनात असेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 01:17 PM2024-04-16T13:17:32+5:302024-04-16T13:19:06+5:30
पहिल्या लेकानंतर दीपिका-शोएबला हवंय दुसरं मुलं, स्वत:च केला खुलासा
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि शोएबच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. दीपिकाने जून महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. दीपिका आणि शोएबने त्यांच्या लेकाचं नाव रुहान असं ठेवलं आहे. रुहाननंतर आता पुन्हा दीपिका आणि शोएब नव्या बाळाचं प्लॅनिंग करत आहेत. त्यांनी स्वत:च याबाबत खुलासा केला आहे.
दीपिका आणि शोएबने नुकतंच त्यांचा ईदचा व्हिडिओ शेअर केला आहे. दीपिका आणि शोएबचा लेक रुहानची ही पहिलीच ईद होती. पण, तो आजारी असल्याने त्यांना ईदचं सेलिब्रेशन हवं तसं करता आलं नाही. रुहान आता ९ महिन्यांचा आहे. त्याला दात येत असल्यामुळे काही दिवसांपासून त्याला ताप येत होता. ईदच्या दिवशीही त्याला ताप होता. त्यामुळे रुहानने त्रास दिल्याचं शोएब-दीपिकाने सांगितलं.
या व्हिडिओत त्यांनी रुहानच्या तब्येतीबाबत माहिती देताना दुसऱ्या बाळाबाबतही भाष्य केलं. "डॉक्टरांनी पण सांगितलं की असं होतं. त्यामुळे आता आम्हाला माहीत आहे की या गोष्टी होतात. आता इन्शाहअल्लाह...अल्लाहच्या मनात आलं आणि आम्हाला दुसरं मुल झालं तर आम्हाला माहीत असेल की या गोष्टी होतात. आणि अशी वेळ येणार आहे," असं शोएब-दीपिका म्हणाले.
शोएब आणि दीपिकाने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ५ वर्षांनी ते आईबाबा झाले. रुहानच्या जन्मानंतर काही महिन्यांनी दीपिका पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगत दीपिका आणि शोएबने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.