दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक !, सोशल मीडियावर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:44 PM2021-01-11T14:44:43+5:302021-01-11T14:45:07+5:30

अशा कठिण प्रसंगी जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार मानले आहेत.

Director Ravi Jadhav Father Passed Away | दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक !, सोशल मीडियावर दिली माहिती

दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक !, सोशल मीडियावर दिली माहिती

googlenewsNext

दिग्दर्शक अभिनेता रवी जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. जाधव कुटुंबियांवर शोककळा पसरलीय.  नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी सांगत भावूक पोस्ट शेअर केली आहे. श्री. हरिश्चंद्र भिकाजी जाधव असे त्यांच्या वडिलांचे नाव असून  ते डोंबिवलीला राहत होते. 


समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वडिलांची तब्येत खराब होती. अखेर ९ जानेवारीला डोंबिवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. सध्या जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अशा कठिण प्रसंगी जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार मानले आहेत. 


रवी जाधवचा मुलगा मरणाच्या दारातून आला परत, जीवनदान देणाऱ्याशी झाली ऑनलाईन भेट

अंश जाधवला १३ व्या वर्षी अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाचं निदान झालं होतं. अंशच्या आजाराविषयी बोलताना त्याची आई मेघना अतिशय भावूक झाल्या. 'एक दाता मिळाला आणि आम्ही भाग्यवान ठरलो. अंशच्या आजाराविषयी कळल्यावर आम्ही अस्वस्थ झालो होतो. केमोथेरपी त्याच्यासाठी पुरेशी नव्हती आणि आमच्या कुटुंबातील कोणाच्या स्टेम सेल त्याला जुळत नव्हत्या. आमच्याकडे फार वेळही नव्हता.त्यामुळे आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करत होतो. त्याच्यावर उपचार करण्याच्या एक दिवस आधी डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी आमच्या आयुष्यातली सर्वांत आनंदाची बातमी दिली. अंशसाठी योग्य असा दाता दात्रीला मिळाला होता. ते क्षण आठवल्यावर आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्या दात्याच्या रुपानं आम्हाला जणू देवच भेटला असं वाटतं. तो आनंद शब्दांत सांगता येणार नाही. अंशसारख्या कित्येक रुग्णांना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी दात्रीकडे नोंदणी करायला हवी,' असं मेघना यांनी सांगितलं.

Web Title: Director Ravi Jadhav Father Passed Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.