Video: बॉडीगार्डच्या चुकीचं नागार्जुनने घेतलं प्रायश्चित; धक्का मारलेल्या दिव्यांग व्यक्तीची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:56 PM2024-06-26T15:56:28+5:302024-06-26T15:57:08+5:30
नागार्जुनच्या बॉडीगार्डने एअरपोर्टवर एका दिव्यांग चाहत्याला धक्का मारल्याने अभिनेत्यावर खूप टीका झाली. आता नागार्जुनने स्वतः एअरपोर्टवर जाऊन चाहत्याची भेट घेतली.
अभिनेता नागार्जुन हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. नागार्जुन गेल्या अनेक वर्षांपासून विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. नागार्जुनने काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ब्रम्हास्त्र सिनेमात साकारलेली छोटी भूमिका चाहत्यांच्या चांगलीच लक्षात राहिली. काही दिवसांपूर्वी नागार्जुन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला. मुंबई एअरपोर्टवर बॉडीगार्डने नागार्जुनला भेटायला आलेल्या एका दिव्यांग जोरात धक्का दिला. आता नागार्जुनने स्वतः एअरपोर्टवर जाऊन त्या चाहत्याची भेट घेतली.
नागार्जुनने दिव्यांग चाहत्याची भेट घेऊन काढला फोटो
नागार्जुनच्या बॉडीगार्डने चाहत्याला ढकलल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला. नागार्जुनला यामुळे प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. नागार्जुनने याप्रकरणी जाहीर माफीही मागितली. मुंबईवरुन घरी परतताना नागार्जुनने एअरपोर्टवर त्या दिव्यांग चाहत्याची भेट घेतली. तुझी काही चूक नाही असं नागार्जुन त्याला म्हणाला. चाहत्याने त्याच्यासाठी खास गिफ्ट आणि पुष्पगुच्छ आणलेला. अभिनेत्याने त्याच्यासोबत फोटो काढला आणि त्याला मिठी मारुन दिलासा दिला.
This just came to my notice … this shouldn’t have happened!!
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) June 23, 2024
I apologise to the gentleman 🙏and will take necessary precautions that it will not happen in the future !! https://t.co/d8bsIgxfI8
नागार्जुनच्या बॉडीगार्डने दिलेला जोरात धक्का
मुंबई एअरपोर्टवर दोन दिवसांपूर्वी नागार्जुन आणि धनुष स्पॉट झाले. दोघेही शांतपणे एअरपोर्टच्या बाहेर पडत होते. अशातच नागार्जुनचा एक दिव्यांग चाहता त्याला भेटण्यासाठी समोर आला. त्याने अभिनेत्याच्या हाताला स्पर्श केला. अभिनेत्याच्या बॉडीगार्डला ही गोष्ट लक्षात येताच त्याने चाहत्याला दूर ढकलले. या कृतीमुळे चाहत्याचा तोल गेला आणि तो मागे पडता पडता वाचला. नागार्जुनला मात्र या कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. धनुषला मात्र ही गोष्ट लक्षात आल्याने त्याने मागे वळून पाहिलं. त्यामुळे नागार्जुनवर लोकांनी टीका केली. अखेर ही गोष्ट लक्षात येताच नागार्जुनने जाहीर माफी मागितली आहे.