तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 07:01 PM2020-01-23T19:01:02+5:302020-01-23T19:02:14+5:30
दिशा आणि तिच्या मुलीला नुकत्याच एका समारंभात पाहाण्यात आले.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
दिशाने 2017 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत कधी परतणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. पण दिशाचा सध्या तरी मालिकेत परतण्याचा विचार नाहीये असे म्हटले जाते. दिशा मालिकेत काम करत नसली तरी तिचे फॅन फॉलोव्हिंग आजही प्रचंड आहे. दिशाच्या मुलीचा फोटो नुकताच समोर आला असून इन्स्टाग्रामवरील दिशाच्या फॅनपेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत दिशाच्या मुलीला आपल्याला पाहायला मिळत असून ती खूपच क्यूट दिसत आहे. हा फोटो एखाद्या समारंभात काढला असेल असे हा फोटो पाहून आपल्याला कळत आहे.
दिशाच्या मुलीचा जन्म 30 नोव्हेंबर 2017 ला झाला असून तिच्या मुलीचे नाव स्तुती आहे. तिची मुलगी खूपच गोंडस असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
दिशा गेल्या कित्येक महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा भाग नसली तरी ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. ही मालिका नेहमीच टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल असते. गेल्या अनेक वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये.