घर वापसी! दिव्यांका त्रिपाठी अन् विवेक दहियाची अखेर सुटका, भारतीय दूतावासाचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:23 PM2024-07-15T12:23:01+5:302024-07-15T12:31:31+5:30

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोप ट्रीपवर होते.

Divyanka Tripathi and Vivek Dahiya finally coming in India after got robbed in Europe | घर वापसी! दिव्यांका त्रिपाठी अन् विवेक दहियाची अखेर सुटका, भारतीय दूतावासाचे मानले आभार

घर वापसी! दिव्यांका त्रिपाठी अन् विवेक दहियाची अखेर सुटका, भारतीय दूतावासाचे मानले आभार

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi)  आणि पती विवेक दहिया (Vivek Dahiya) परदेशात अडकले होते. पासपोर्टसह त्यांचं बरंच सामान चोरीला गेलं होतं. स्थानिक पोलिसांची त्यांना वेळेत मदतही मिळु शकली नव्हती. तेव्हा त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. आता हे कपल अखेर भारतात परतत आहे. दूतावासाच्या मदतीमुळे त्यांची भारतात परतण्याची सोय झाली आहे.

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोप ट्रीपवर होते. तेथील फ्लोरेन्स शहरात फिरत असताना त्यांच्या कारची तोडफोड करुन सामान चोरी झालं. सोशल मीडियावरुन त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. मित्रांनी त्यांना पैशांची मदत केली. आता नुकतंच दिव्यांकाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिले, 'लवकरच भारतात येत आहोत. तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी आम्ही आभारी आहोत. भारतीय दूतावासाचे खूप खूप धन्यवाद'.

विवेकनेही काल परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं होतं. पैशांची मगत झाल्याचंही कळवलं होतं. 'आमची जिद्द कायम आहे ती कोणीच हिरावून घेऊ शकत नाही' अशी पोस्ट त्याने केली होती. 

नेमकं काय घडलं?

सदर घटनेची माहिती 'ई टाईम्सला' देत विवेक दहिया म्हणाला, "आम्ही काल फ्लोरेंसमध्ये पोहचलो. त्यानंतर आम्ही इथे आणखी एक दिवस राहायचं असं ठरवलं. त्यासाठी मी आणि दिव्यांका दोघेही राहायला जागा पाहण्यासाठी गेलो आणि बाहेर कारमध्ये आमचं सामान तसंच ठेवलं. काही वेळानंतर जेव्हा आम्ही बाहेर सामान घेण्यासाठी परतलो तेव्हा आमच्या कारच्या काचा तोडून आमचं सामान कोणीतरी चोरलं होतं. हे सगळं पाहून आम्हाला धक्काच बसला".

Web Title: Divyanka Tripathi and Vivek Dahiya finally coming in India after got robbed in Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.