शेजाऱ्याच्या घरात सोडले होते रॉकेट, ऐन दिवाळीत प्रीती झिंटाला पडलेला मार, वाचा मजेशीर किस्सा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:24 PM2024-10-28T18:24:11+5:302024-10-28T18:24:18+5:30
आयपीएल असो किंवा किंवा सोशल मीडिया तिची जादू सगळीकडे पाहायला मिळते.
दिवाळीची लगबग सुरू झाली. दिवाळी हा सण आपल्या प्रत्येकासाठी अनेक आठवणींचा ठेवा असलेला असा सण आहे. विशेषतः आपण जसेजसे मोठे होऊ लागतो, तस तशा लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी आपल्या मनात दाटून यायला लागतात. सेलिब्रिटींही त्याला अपवाद नाहीत. अशीच एक खास आठवण अभिनेत्री प्रीती झिंटा हीची आहे.
'डिंपल गर्ल' प्रीतीला दिवाळीत फटाके फोडायला फार आवडायचे. एकदा तर तिने थेट शेजाऱ्याच्या घरातच रॉकेट सोडलं होतं आणि त्यामुळे ऐन दिवाळीत प्रीतीला मार पडला होता. ती घटना आजपर्यंत प्रीती विसरलेली नाही.
दैनिक जागरणने दिलेल्या बातमीनुसार एका थ्रोबॅक मुलाखतीत प्रीती म्हणाली होती, "मी 10 वर्षांचा होते, तेव्हा वडील सैन्यात होते. आम्ही राहायचो तिथे इमारती नाही, तर बंगले होते, जे एकमेकांच्या अगदी जवळ होते. आमच्या शेजारील बंगल्यात राहणारे काका-काकू नेहमी खूप गंभीर असायचे. दिवाळीच्या दिवशी आम्ही रॉकेट लावले आणि ते रॉकेट थेट त्याच्या खोलीत गेले. याचा त्यांना खूप राग आला होता. यामुळे मी खूप मारही खाल्ला".
प्रीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर 1947' या चित्रपटात सनी देओलसोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे प्रिती आणि सनीची जोडी अनेक वर्षांनी पुन्हा बघायला मिळणार आहे. प्रितीला इतक्या वर्षांनी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सिनेमाशिवायही प्रीती कायम चर्चेत असते. आयपीएल असो किंवा किंवा सोशल मीडिया तिची जादू सगळीकडे पाहायला मिळते.