अभिनय नको रे बाबा!

By Admin | Published: June 20, 2016 02:18 AM2016-06-20T02:18:25+5:302016-06-20T02:18:25+5:30

‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या टीमसाठीही अनपेक्षित होता.

Do not act ray baba! | अभिनय नको रे बाबा!

अभिनय नको रे बाबा!

googlenewsNext

‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या टीमसाठीही अनपेक्षित होता. या मालिकेची टीम सध्या दुसऱ्या सिझनसाठी सज्ज झाली असून, हा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा रेमो डिसोझा याने ‘सीएनएक्स’सोबत मारलेल्या या गप्पा...

प्रश्न : ‘डान्स प्लस २’ या कार्यक्रमाची तयारी कशा प्रकारे सुरू आहे?
4‘डान्स प्लस’ हा कार्यक्रम सुरू झाला, त्या वेळी या कार्यक्रमाला इतकी प्रसिद्धी मिळेल, असा आम्ही विचारदेखील केला नव्हता, पण कार्यक्रम सुरू झाल्यावर प्रेक्षकांनी कार्यक्रमाला अक्षरश: डोक्यावर घेतले. पहिल्या सिझनला मिळालेला प्रतिसाद पाहाता, दुसऱ्या सिझनला आम्हाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळणार याची आम्हाला खात्री होती आणि त्याचा अनुभवदेखील आम्हाला मिळाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आॅडिशनच्या आदल्या दिवसापासून लोक हजारोच्या संख्येने रांगेत उभे राहात होते.
प्रश्न : तू ‘डान्स प्लस’ या कार्यक्रमात सर्वसामान्य लोकांच्या नृत्याचे परीक्षण करतोस, तर ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात तू सेलिब्रिटींच्या नृत्याचे परीक्षण केले आहे. या दोन्हीमध्ये तुला कोणता फरक जाणवतो?
4कोणत्याही सेलिब्रिटीच्या नृत्याचे परीक्षण करताना त्याच्या नृत्यासोबतच त्याचे समाजात असलेले स्टेटस याचाही नक्कीच विचार करावा लागतो. कारण त्या सेलिब्रिटीवर प्रेम करणारे हजारो लोक असतात. आपण काही वाईट बोललो ते सेलिब्रेटीला जरी पटले, तरी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना याचा राग येऊ शकतो. त्यामुळे खूप विचार करून बोलावे लागते. सामान्य लोकांबद्दल सांगायचे झाले, तर अनेक जणांच्या बाबतीत डान्स हे सर्वस्व असते. त्यामुळे आपल्या एखाद्या प्रतिक्रियेमुळे ते दुखावले जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागते. काही जण तर वाईट प्रतिक्रिया मिळाल्या, तर नृत्य कायमचे सोडण्याचादेखील विचार करतात. त्यामुळे कोणाच्याबाबतीतही असे होऊ नये, याची काळजी मला परीक्षण करताना घ्यावी लागते. त्यामुळे कोणत्याही नृत्याचे परीक्षण करणे हे तितकेच कठीण असते, असे मला वाटते.
प्रश्न : तू ‘फ्लार्इंग जट’ या चित्रपटात झळकणार आहेस, या चित्रपटात तू एका पंजाबी माणसाची भूमिका साकारत आहेस. या चित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
4मी ‘एबीसीडी’ या चित्रपटात काम
केले असले, तरी या चित्रपटात मी एक अभिनेता म्हणून लोकांसमोर आलो नव्हतो, पण पहिल्यांदाच ‘फ्लार्इंग जट’ या चित्रपटात एक कलाकार म्हणून मी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण केल्यानंतर अभिनय ही सोपी गोष्ट नसते, हे माझ्या लक्षात आलेले आहे. त्यातही ही भूमिका एका पंजाबी माणसाची असल्यामुळे भूमिकेच्या भाषेवर, देहबोलीवर मला अधिक मेहनत घ्यावी लागली.
प्रश्न : ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक ‘एबीसीडी ३’ ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला केव्हा सुरुवात होणार आहे?
4‘एबीसीडी ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मी लवकरच सुरुवात करणार असून,
पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा माझा विचार आहे. या चित्रपटाची टीम ही माझ्यासाठी दुसरे कुटुंबच बनली आहे. त्यामुळे यामधील कोणालाही वगळण्याचा मी विचारही करू शकत नाही.
त्यामुळे आता ‘एबीसीडी ३’मध्येदेखील माझी जुनी टीमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Do not act ray baba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.