‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 08:40 PM2018-12-18T20:40:00+5:302018-12-18T20:40:00+5:30

स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळते आहे.

Do you know about Bhairavi in 'Lalit 205'? | ‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

googlenewsNext
ठळक मुद्देअमृताचा अभिनय हाच श्वास

स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळते आहे. या मालिकेत भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.  

अमृता खो-खो या खेळामध्ये पारंगत असली तरी अभिनय हाच तिचा श्वास आहे. अभिनयाच्या याच वेडापायी तिची खेळामधली आवड मागे पडली. कॉलेजमधून एकांकिका करत असतानाच स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेत काम करण्याची अमृताला संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या अभिनय वाटचालीला सुरुवात झाली. ‘ललित २०५’ मधून भैरवीच्या रुपात ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकली. अमृताने नृत्याचेही प्रशिक्षण घेतले आहे.
विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी भैरवी म्हणजे जुन्या आणि नव्या विचारांमधला दुवा. भैरवीप्रमाणेच अमृताही आपल्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देते. तिच्या मते नाती जपणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भैरवी प्रमाणेच अमृताही खऱ्या आयुष्यात रोखठोक आहे. आपल्या मनातली गोष्ट स्पष्टपणे मांडायला हवी असे तिला वाटते.
अमृता आपल्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक आहे. सकस आहार आणि नियमित व्यायाम हेच आपल्या फिटनेसचे रहस्य असल्याचे ती सांगते. पण फिटनेसच्या हट्टापायी मन मारुन जगणे तिला पटत नाही. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर मी आवर्जून खाते असे अमृताने सांगितले.
 
पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे  दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे.  'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Do you know about Bhairavi in 'Lalit 205'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.