Happy B'day Aishwarya Rai: लहानपणापासूनच ऐश्वर्याला वाटायची एका गोष्टीची भीती, घरातून बाहेर निघणंही केलं होतं बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 11:40 AM2021-11-01T11:40:57+5:302021-11-01T11:41:16+5:30

फोटोजेनिक चेहरा हे Aishwarya Rai चं वैशिष्ट्य होतं. त्यामुळं नवव्या इयत्तेत असताना एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली.

Do you Know Aishwarya Rai Bachchan was having this fear in her childhood to go out of house, check you will be amazed | Happy B'day Aishwarya Rai: लहानपणापासूनच ऐश्वर्याला वाटायची एका गोष्टीची भीती, घरातून बाहेर निघणंही केलं होतं बंद

Happy B'day Aishwarya Rai: लहानपणापासूनच ऐश्वर्याला वाटायची एका गोष्टीची भीती, घरातून बाहेर निघणंही केलं होतं बंद

googlenewsNext

सौंदर्य... अभिनय... हुशारी... याचं अभिजात ऐश्वर्य... भारतीय चित्रपटसृष्टीचा एक तेजोमय तारा म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन. भारतीय सिनेमाच नाही तर जगभरातल्या सिनेप्रेमींवर आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी सौंदर्यवती.तिचे डोळे जितके बोलके तितकीच जादू तिच्या अभिनयातही. ब्युटी विथ ब्रेन एंड टॅलेंट असा जिचा उल्लेख केला जातो. त्या परीचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटक राज्यातल्या मंगलोरमध्ये झाला. वडिल कृष्णराज हे मरीन बायोलॉजिस्ट आणि आई वृंदा गृहिणी. आईवडिलांनी आपल्या या लाडक्या परीचं नाव प्रेमानं ऐश्वर्या ठेवलं. लाडाने तिला 'आएशू' आणि 'गुल्लू' असंही नावही तिला दिलं. 

तिला एक मोठा भाऊसुद्धा. ज्याचं नाव आदित्य राय असून मर्चंट नेव्हीत इंजीनिअर म्हणून तो काम करतो. लहानपणापासूनच ऐश्वर्यावर पालकांकडून नैतिक मूल्याचे धडे आणि संस्कार घडत होते. कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या  प्रत्येक लहानसहान गोष्ट चिमुकल्या ऐश्वर्याच्या मनात घट्ट बसू लागल्या.त्याच दरम्यान राय कुटुंबीय मंगलोरमधून मुंबईला आले. चिमुकल्या ऐश्वर्यानेही मुंबईतल्या आर्या विद्या मंदिर हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला. कुटुंबीयांसोबतच ऐश्वर्यावर शालेय शिक्षकांकडून संस्कार घडत होते.सुरुवातीपासून ऐश्वर्या एक हुशार विद्यार्थिनी होती. अभ्यासात एक नंबर असलेली ऐश्वर्या लवकरच साऱ्या शिक्षकांची लाडकी बनली.अभ्यासासोबत तिला नृत्यामध्येही विशेष आवड होती.

शाळेत असताना लहानगी ऐश्वर्या मराठमोळ्या लावणीवर थिरकली हे ऐकून अनेकांना धक्काच बसेल.या कार्यक्रमात ऐश्वर्याचं हे डान्सप्रेम पाहून सारेच थक्क झाले होते.डान्सवरील या प्रेमामुळे आईवडिलांनी ऐश्वर्याला लता सुरेंद्रन यांच्याकडे शास्त्रीय नृत्याचे धडे घेण्यास पाठवलं. अगदी मन लावून ऐश्वर्याने प्रत्येक डान्स स्टेप गुरुकडून आत्मसात करुन घेतली.शालेय शिक्षण आणि नृत्याचे धडे गिरवत असताना ऐश्वर्याने बाल विकास केंद्रात मूल्यशिक्षणाचाही अभ्यास केला.

फोटोजेनिक चेहरा हे ऐश्वर्याचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळं नवव्या इयत्तेत असताना एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. ऐश्वर्याच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से नेहमीच चर्चेत असतात.तिचा एक किस्सा ज्याचीही अनेकदा चर्चा होते.ऐश्वर्या 4-5 वर्षांची असताना खूप क्युट दिसायची. त्यामुळे तिला पाहताच लोकं तिला आवर्जुन भेटायचे.अनेकदा तर लोक आईला थांबवून ऐश्वर्याला मनं भरुन बघण्याची परवानगी मागायचे. त्यावेळी ऐश्वर्याला लोकं इतकं लाडाने का पाहतात हे कळत नव्हते. याच गोष्टीची छोट्या ऐश्वर्याला मात्र खूप भीती वाटायची.
 

Web Title: Do you Know Aishwarya Rai Bachchan was having this fear in her childhood to go out of house, check you will be amazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.