.... म्हणून तयारच होऊ शकला नाही 'हेरा फेरी 3', पहिल्यांदाच समोर आलं खरं कारण
By गीतांजली | Published: December 23, 2020 07:15 PM2020-12-23T19:15:00+5:302020-12-23T19:15:01+5:30
फिरोज नाडियाडवाला यांनी 'हेरा फेरी 3' बनवण्याचा प्रयत्न केला पण...
जेव्हा जेव्हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटांबद्दल चर्चा होईल तेव्हा त्यात 'हेरा फेरी' नाव निश्चितच असेल. सुमारे 20 वर्षांपूर्वी जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा तो थिएटरमध्ये फारशी कामगिरी करू शकली नाही, परंतु त्यानंतर लवकरच तो चांगलाच लोकप्रिय झाला. यानंतर 'फिर हेरा फेरी' सिनेमाचा सिक्वेलही तयार करण्यात जो प्रेक्षकांना खूप आवडला. चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची बरीच प्रतीक्षा करत होते, पण तो आजपर्यंत बनू शकला नाही. आता यामागील कारणे समोर आली आहेत.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार फिरोज नाडियाडवाला यांना हा सिनेमा काही काळापूर्वी तयार करायाचा होता. याबद्दल ते अक्षय कुमारशी बोललो पण अक्षयने हा चित्रपट करण्यापूर्वी दोन अटी ठेवल्या. असे सांगितले जात आहे की अक्षयने पहिली अट ठेवली की राज शांडिल्य हा सिनेमा 'ड्रीम गर्ल' सारखा विनोदी बनवतील आणि दुसरी म्हणजे, त्याला या सिनेमा 70 % प्रॉफिट शेअरिंग हवं.
असं म्हणतात की, फिरोज अक्षयच्या दुसर्या चित्रपटावर सहमत नव्हते. त्यांनी राज शांडिल्य यांना चित्रपटाची ऑफर दिली होती मात्र त्यांनी दिग्दर्शन करण्यास नकार दिला. त्यांनी कारण दिले की ते, 'हेरा फेरी' सारख्या क्लासिक चित्रपटाच्या सिक्वेलसोबत न्याय करु शकणार नाहीत. तरीही फिरोज नाडियाडवाला यांनी 'हेरा फेरी 3' बनवण्याचा प्रयत्न केला.
2015 मध्ये फिरोज नाडियाडवालानेही 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला सुरुवात केली होती. यावेळी त्याने अक्षय आणि सुनील शेट्टीच्या जागी जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांना कास्ट केले. या चित्रपटात परेश रावल बाबूराव आपटेची भूमिका साकारणार होते. या सिनेमात नेहा शर्माला अभिनेत्री म्हणून साइन केले होते. पण काही दिवसांच्या शूटिंगनंतर काही आर्थिक अडचणींमुळे त्याचे शूटिंग थांबवावे लागले आणि चित्रपटात थंड बस्त्यात गेला. चाहते अजूनही 'हेरा फेरी 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.