बर्थडे गर्ल कतरिनाबद्दल या '१०' गोष्टी माहीत आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 08:59 AM2016-07-16T08:59:59+5:302016-07-16T09:07:07+5:30

नमस्ते लंडन, एक था टायगर, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, ३ असे एकाहून एक हिट चित्रपट देणारी, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस

Do you know these '10 things' about Birthday Girl Katrina? | बर्थडे गर्ल कतरिनाबद्दल या '१०' गोष्टी माहीत आहेत का?

बर्थडे गर्ल कतरिनाबद्दल या '१०' गोष्टी माहीत आहेत का?

googlenewsNext
>मीनाक्षी कुलकर्णी 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - नमस्ते लंडन, एक था टायगर,  अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, धूम ३ असे एकाहून एक सरस व हिट चित्रपट देणारी व बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज ३२ वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कतरिनाबद्दलची खास माहिती... 
 
१)  १६ जुलै १९८३ साली हाँगकाँग येथे जन्मलेल्या कतरिनाला सात भावंडे आहेत.  तिला एक मोठा भाऊ , तीन मोठ्या बहिणी व  तीन लहान बहिणी आहेत. 
२) कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला. तिची आई सामाजिक कार्यकर्ती असल्याने कैफ परिवाला दर दोन वर्षांनी आपला बाडबिस्तरा उचलून नवनव्या ठिकाणी, देशांत प्रवास करावा लागत असे. 
३) कतरिना लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या क्षेत्रात आहे. 
4) २००३ साली कतरिना भारतात आली. तिचा पहिला चित्रपट 'बूम' दणकून आपटला, मात्र या अपयशाने खचून न जाता अथक मेहनत करत तिने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवले. 
५) कतरिना साडेतीन वर्ष रोज काम करत राहिली, काही वेळा तर ती दिवसातील १६-१६ तास काम करत असे. न थकता, न कंटाता काम करण्याच्या आपल्या सवयीमुळे आज आपल्याला हे यश, प्रसिद्धी मिळत असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे.
६)  डेव्हिड धवन यांच्या 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटात ती प्रथमच सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकली. मात्र २००७ साली आलेल्या 'नमस्ते लंडन' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आणि कतरिनाने प्रथमच यशाची चव चाखली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटापासून तिची व अक्षय कुमारची जोडी हिट ठरली. 
७) कतरिना तिच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सिद्धीविनायक मंदिर, माऊंट मेरी चर्च आणि अजमेर शरीफ दर्ग्याला भेट देते.
८) कतरिनाला तिचे कपडे ऑनलाइन ऑर्डर करायला आवडतात. 
९) कतरिनाला अंधार आणि कीटक, किड्यांची खूप भीती वाटते.
१०) मितभाषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कतरिनाला 'बार्बी गर्ल'ही म्हटले जाते. तिला दहीभात खूप आवडतो. 
 
  आणखी वाचा 
(सनी लिऑनला योग्य तो मान द्यायला हवा - कतरिना कैफ)
(भारत सहिष्णू देश आहे - कतरिना कैफ)
 
 
 

Web Title: Do you know these '10 things' about Birthday Girl Katrina?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.