'कबाली'बद्दल या १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By Admin | Published: July 22, 2016 12:06 PM2016-07-22T12:06:47+5:302016-07-22T12:33:19+5:30

दक्षिणेत देव मानला जाणारा, सुपरस्टार अभिनेता शिवाजीराव गायकवाड म्हणजेच सर्वांच्या लाडक्या रजनीकांत यांचा नवा चित्रपट 'कबाली' आज सर्वत्र प्रदर्शित झाला.

Do you know these 10 things about 'Kabbali'? | 'कबाली'बद्दल या १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

'कबाली'बद्दल या १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ -  दक्षिणेत देव मानला जाणारा, सुपरस्टार अभिनेता शिवाजीराव गायकवाड म्हणजेच सर्वांच्या लाडक्या रजनीकांत यांचा नवा चित्रपट 'कबाली' आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. आपल्या लाडक्या नायकाचा चित्रपट पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून अनेक ठिकाणी पहाटेचे शोही हाऊसफुल्ल झाले आहेत. कबालीच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चित्रपटाविषयी १० रंजक गोष्टी...
 
१) ६५ वर्षीय रजनिकांतचा हा १५९ वा चित्रपट आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रजनीकांत स्वतःच्या वयाला साजेशी भूमिका साकारणार आहेत.
 
२)थिएटर्समध्ये  पहाटे पाच वाजता प्रदर्शित झालेला 'कबाली' हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे.
 
3) कबाली या चित्रपटाच्या निमित्ताने दक्षिणेकडील राज्यातील अनेक शहरात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या चित्रपटाची तिकिटे मोफत दिली आहेत.
 
४) कबाली एकाच दिवशी भारत, चीन, अमेरिका येथे प्रदर्शित करण्यात आला आहे. चीनमध्ये ४५०,  अमेरिकेत ४००, तर मलेशिया, जपान आणि इंडोनेशियामध्ये मिळून ३०० स्क्रीन्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहाता येणार आहे. तसेच हा चित्रपट फ्रान्समधील ली ग्रँड रेक्स या जगातल्या सर्वात मोठ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ली ग्रँड रेक्समध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
 
 आणखी वाचा :
('कबाली'साठी चेन्नई, बंगळुरुत सुट्टी !)
(रजनीकांतचा 'कबाली' प्रदर्शनापूर्वीच लीक !)
('कबाली'चा प्रमोशनचा अनोखा फंडा, विमानावर रंगवले पोस्टर) 
 
५) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक अनोखा फंडा वापरण्यात आला होता. एअर एशियाच्या विमानावर पोस्टर लावून चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. तसेच चाहत्यांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता यावा, यासाठी एअर एशियाने विशेष विमानसफारीचं आयोजन केलं असून हे खास विमान बंगळुरुतून उड्डाण घेऊन चेन्नईला उतरले. या विमानाचं तिकीट ७,८६० रुपये होते. यामध्ये विमान तिकिटाशिवाय कबाली सिनेमाचं तिकीट, ऑडिओ सीडी, नाश्ता, जेवण, स्नॅक्स यांचा समावेश होता.
 
६) कबाली हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी ऑनलाईन लीक झाला असला तरी त्याचा चित्रपटाच्या व्यवसायावर काहीही परिणाम झालेला नाही. अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्या तीन दिवसांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले असून सगळेच शो हाऊसफुल आहेत.
 
7) कबाली या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १६० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पण प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनापूर्वी निर्मितीचे पैसे वसूल करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.
 
 
८) दाक्षिणात्य चित्रपट हे उत्तर भारतात व्यवसाय करत नाही असे अनेक वर्षांपासूनच गणित आहे. उत्तर भारतातल्या १००० स्क्रिनवर प्रदर्शित होणारा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे.
 
 
 
९) कबाली या चित्रपटाच्या ट्रेलरला एका आठवड्यात अडीच कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
 
 
१०) कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार असला की त्या चित्रपटातले कलाकार मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे प्रमोशन करतात. पण रजनीकांत हे प्रमोशन करत असताना कुठेही  दिसत नाहीयेत. विशेष म्हणजे ते सध्या भारतातही नाहीत. ते अमेरिकेत आपल्या गुरुंना भेटायला गेलेले आहेत.
 

Web Title: Do you know these 10 things about 'Kabbali'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.