फोटोतील या त्रिमुर्तींना ओळखलंत का?, एक आहे अभिनेता तर दोन राजकारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 05:54 PM2023-04-06T17:54:00+5:302023-04-06T17:56:25+5:30

रितेशन आपल्या लहान भावाला म्हणजे धीरज देशमुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Do you recognize these triplets in the photo? One is an actor and two are politicians ritesh deshmukh and dhiraj deshmukh | फोटोतील या त्रिमुर्तींना ओळखलंत का?, एक आहे अभिनेता तर दोन राजकारणी

फोटोतील या त्रिमुर्तींना ओळखलंत का?, एक आहे अभिनेता तर दोन राजकारणी

googlenewsNext

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा अशा अभंगाच्या ओळी आपण ऐकल्या असतीलच. त्यामुळे, बालपण हे प्रत्येकालाच आठवणींच्या आणि कुटुंबातील प्रेमळ क्षणांचा आनंद देणारं असतं. मोठं झाल्यानंतर आयुष्याकडे मागे वळून पाहताना, बालपणीच्या आठवणी अतिशय गोड वाटतात. त्याच बालपणावर आपण चर्चाही करत असतो. आपले भावंड, लहानपणीचे मित्र यांच्यासमवतेचे ते क्षण भावूक करुन जातात. अभिनेता रितेश देशमुखने लहान भावाच्या वाढदिवसानिमित्त असाच एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. 

रितेशन आपल्या लहान भावाला म्हणजे धीरज देशमुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना मध्ये धीरज तर उजवीकडे अमित देशमुख आणि डावीकडे रितेश देशमुख दिसून येतात. बालपणीचा हा फोटो पाहिल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही रितेश देशमुखला पाहून हा फोटो ओळखू शकाल. या फोटोसह शुभेच्छा देताना रितेशने म्हटले आहे की, माझ्या प्रिय धीरज.. आम्ही दोघेही नेहमीच तुझा डावीकडे आणि उजवीकडे आहोत, तुझी कायमची ढाल बनून आहोत, तुझा यंदाचा वाढदिवस चांगला जावो. तू चांगल काम करत आहेस. यापुढेही पप्पांना तुझा अभिमान वाटेल असं काम करत राहा.. अशा शब्दांत रितेशने धीरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेशने शेअर केलेला हा बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कोणाचा आणि यात कोण-कोण आहेत, असा प्रश्न विचारला जातोय. तर, फोटोमध्ये उजवीकडून रितेश, मध्ये धीरज आणि डावीकडे अमित देशमुख हे आहेत.
 

Web Title: Do you recognize these triplets in the photo? One is an actor and two are politicians ritesh deshmukh and dhiraj deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.