भूतनाथमधील बंकू आठवतो का? बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणारा चिमुकला आता दिसतो खूपच हॅण्डसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 17:38 IST2022-01-23T17:38:12+5:302022-01-23T17:38:54+5:30
Aman siddiqui: 'भूतनाथ' या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जुही चावला असे दिग्गज कलाकार झळकले होते. यामध्ये बंकू या बालकलाकाराने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.

भूतनाथमधील बंकू आठवतो का? बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणारा चिमुकला आता दिसतो खूपच हॅण्डसम
कलाविश्वात अनेक दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत अनेक बालकलाकारांचीही रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक बालकलाकारांच्या भूमिका गाजल्या आहेत. यातील काही लहान मुलं प्रेक्षकांच्या स्मरणातही असतील. विशेष म्हणजे एकेकाळी बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवलेली ही लहान मुलं मोठी झाली असून यातील अनेक जण कलाविश्वात सक्रीयदेखील आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे अमन सिद्धीकी. कदाचित हे नाव घेतल्यावर तुमच्या पटकन लक्षात येणार नाही. मात्र, 'भूतनाथ'मधील बंकू असं म्हटलं की लगेच या चिमुकल्याचा निरागस चेहरा तुमच्या समोर येईल. 'भूतनाथ' चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारा बंकू आता मोठा झाला आहे. त्यामुळे तो आता काय करतो, कसा दिसतो याविषयी जाणून घेऊयात.
'भूतनाथ' या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जुही चावला असे दिग्गज कलाकार झळकले होते. यामध्ये बंकू या बालकलाकाराने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. ही भूमिका अमन सिद्दीकी याने साकारली होती. या चित्रपटानंतर अमनने अनेक चित्रपट, जाहिरातींमध्ये काम केलं. मात्र, त्यानंतर त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी अमनने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्याचं सांगण्यात येतं. परंतु, अमन आता मोठा झाला असून तो हॅण्डसम दिसत असल्याचं म्हटलं जातं. कलाविश्वाप्रमाणेच त्याचा सोशल मीडियावरील वावरही कमी असल्याचं दिसून येतं.