सुयशचे झाले स्वप्न पूर्ण
By Admin | Published: August 12, 2016 01:49 AM2016-08-12T01:49:47+5:302016-08-12T01:49:47+5:30
मा लिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकलेल्या सुयश टिळकला बाईक रायडिंगची फार आवड आहे. आपल्याकडेदेखील एक मस्त बाईक असावी आणि आपण तिला घेऊन
मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकलेल्या सुयश टिळकला बाईक रायडिंगची फार आवड आहे. आपल्याकडेदेखील एक मस्त बाईक असावी आणि आपण तिला घेऊन दूर कुठेतरी जावे असे स्वप्न सुयशने लहानपणापासूनच पाहिले होते. पण म्हणतात ना प्रबळ इच्छाशक्ती असेल तर स्वप्नपूर्ती नक्कीच होते. असेच काहीसे सुयशच्या बाबतीत झाले. सुयशचे बाईक रायडिंगचे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले. त्याने जम्मू ते लडाख हा प्रवास बाईकवरून केला. सुयशने त्याचा हा थरारक प्रवास सीएनएक्ससोबत शेअर केला. सुयश सांगतो, ‘लेह-लडाख, हिमालयाचे आकर्षण तर मला नेहमीच होते. मला बाईक चालवत लडाखला जायचे होते. पण कधी हिंमतच व्हायची नाही. माझे बाबा बाईकवरून नुकतेच भुटानला जाऊन आले आहेत. बाबा जर या वयात जाऊ शकतात तर मी का नाही? हा विचार करून माझ्या मित्रांच्या ग्रुपसोबत मी लडाखला जायला निघालो. जम्मूपासून आमचा प्रवास सुरू झाला. तिकडच्या लोकांना भेटून मला खूप आनंद झाला. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. लडाखमधील वातारण कधीही बदलू शकते हे मला तिथे गेल्यावर चांगलेच कळले. कारण प्रवासात एका ठिकाणी आम्हाला गारांचा पाऊसदेखील लागला. बर्फात बाईक रायडिंग करण्याची मजाच काही और असते. लडाखची ही थरारक बाईक रायडिंग ट्रीप माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय ठरली.’