...म्हणून बदलली चित्रपटांची रिलीज डेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 02:49 PM2018-12-28T14:49:38+5:302018-12-28T14:52:08+5:30

२०१८ मध्ये मनोरंजन जगतात बरेच काही बघावयास मिळाले. हे वर्ष अनेक सेलेब्ससाठी विशेष ठरले. या शिवाय काही चित्रपटांना विरोध, प्रदर्शन तसेच वादा-विवादास तोंड देऊन चित्रपटगृहापर्यंत पोहचावे लागले.

Due to this changed Movie Release Date | ...म्हणून बदलली चित्रपटांची रिलीज डेट!

...म्हणून बदलली चित्रपटांची रिलीज डेट!

googlenewsNext

-रवींद्र मोरे 

२०१८ मध्ये मनोरंजन जगतात बरेच काही बघावयास मिळाले. हे वर्ष अनेक सेलेब्ससाठी विशेष ठरले. या शिवाय काही चित्रपटांना विरोध, प्रदर्शन तसेच वादा-विवादास तोंड देऊन चित्रपटगृहापर्यंत पोहचावे लागले. काही चित्रपटांची तर रिलीज डेट बदलल्यानंतर निर्देशकांसह कलाकारांनाही नुकसान सहन करावे लागले. सोबतच त्यांच्या चाहत्यांनाही प्रतीक्षा करावी लागली. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया जे पडद्यावर निश्चित केलेल्या तारखेला रिलीज होऊ शकले नाही.  

* पद्मावत
यावर्षाच्या सुरुवातीला दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूरचा चित्रपट ‘पद्मावत’ ला खूपच विरोधाचा सामना करावा लागला होता. तसा हा चित्रपट गेल्या वर्षीच रिलीज होणार होता, मात्र त्याची रिलीज डेट बदलून यावर्षी २५ जानेवारी करण्यात आले. या अगोदरही या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भंसालीने केले आहे. 

* पॅडमॅन
वर्षाच्या सुरूवातीला पद्मावतची रिलीज डेट बदलल्याने बऱ्याच चित्रपटांच्या निश्चित केलेल्या रिलीज डेटवरही परिणाम झाला. यात अक्षय कुमार स्टारर पॅडमॅनचाही समावेश आहे. पॅडमॅनची रिलीज डेट अगोेदर २५ जानेवारी होती, मात्र पद्मावतच्या कारणाने या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलून ९ फेब्रुवारी करण्यात आली होती. पॅडमॅनचे दिग्दर्शन आर बाल्कि यांनी केले आहे. 

* बत्ती गुल मीटर चालू
यावर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झालेला शाहिद कपूर, यामी गौतम आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट बत्ती गुल मीटर चालू याचीही रिलीज डेट बदलण्यात आली होती. हा चित्रपट अगोेदर ३१ आॅगस्टला रिलीज होणार होता. मात्र नंतर हा चित्रपट १४ सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात आला. याचे दिग्दर्शन श्री नारायण सिंह यांनी केले होते.  

* 2.0
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारचा चित्रपट '2.0' आता जरी रिलीज झाला आहे, मात्र जेव्हापासून हा चित्रपट बनण्यास सुरुवात झाला तेव्हापासून याची रिलीज डेट बऱ्याचदा बदलण्यात आली. बऱ्याच तारखा बदलल्यानंतर हा चित्रपट या दिवाळीला रिलीज होणार होता. मात्र प्री प्रोडक्शनचे काम अपूर्ण असल्याने याची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दशर्न एस. शंकरने केले असून हा चित्रपट प्रेक्षकांनी डोेक्यावर घेतला आहे. 

*केदारनाथ
काही दिवसांपूर्वीच केदारनाथ रिलीज झाला आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा हा डेब्यू चित्रपट दर्शकांनाही आवडत आहे. केदारनाथला रिलीजच्या अगोदर फक्त वाद-विवादांचाच सामना करावा लागला नाही तर याची रिलीज डेटही बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आली. बऱ्याच वादानंतर हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला. याचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. 

Web Title: Due to this changed Movie Release Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.