मुसळधार पावसामुळे या मालिकेचे शूटिंग झालं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 09:36 AM2018-07-12T09:36:11+5:302018-07-12T09:38:41+5:30

मालिकांचं चित्रीकरण हे आठवड्यातील ७ ही दिवस १२ -१२ तास चालतं त्यात अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे फुलपाखरूची टीम सुखावली

Due to heavy rain, the series has been shot down | मुसळधार पावसामुळे या मालिकेचे शूटिंग झालं रद्द

मुसळधार पावसामुळे या मालिकेचे शूटिंग झालं रद्द

googlenewsNext

झी युवा वाहिनीवरील लोकप्रिय मालिका फुलपाखरूच्या सेट वर मुसळधार पावसामुळे  शूटिंगला खाडा झाला आणि संपूर्ण टीमला एक अनपेक्षित सुट्टी मिळाली. रविवार पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय आणि या पावसाचा परिणाम मालिकेच्या चित्रीकरणावर देखील झाला. जोरदार पावसात प्रवास करणे सुरक्षित नसल्यामुळे फुलपाखरूच्या टीमला सुट्टी देण्यात आली.

मालिकांचं चित्रीकरण हे आठवड्यातील ७ ही दिवस १२ -१२ तास चालतं त्यात अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे फुलपाखरूची टीम सुखावली आणि हा सुट्टीचा दिवस घरी आराम करत घालवावा कि बाहेर पावसाचा आनंद लुटावा या विचारात आहे. नक्कीच दिग्दर्शकासाठी पावसामुळे पुढे ढकललं गेलेलं शूट पूर्ण करणे ही तारेवरची कसरतच असते.

पावसामुळे मिळालेल्या सुट्टी बद्दल अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणाली, "मुसळधार पावसामुळे टीम मधील काही लोकं शूटिंगसाठी पोहोचू शकले नाहीत आणि त्यामुळे आम्हाला शूटिंगला सुट्टी देण्यात आली. लहानपणी आपण शाळेत असताना आपल्याला जोरात पाऊस पडला की सुट्टी मिळायची, मालिकेचं शूटिंग करताना तसा ऑप्शन नसतो पण आज अनपेक्षितपणे सुट्टी मिळाली त्यामुळे मी माझ्या घरच्यासोबत आज वेळ घालवणार आहे आणि पावसाचा आनंद घेणार आहे." तसेच अभिनेता यशोमन आपटे म्हणाला, "आजचा मुसळधार पाऊस बघून मला आमच्या मालिकेतील पावसाळ्यात नुकतंच शूट केलेलं गाणं आठवलं. लागोपाठ शूटिंग करत असल्यामुळे अशी अनपेक्षित सुट्टी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. आज आराम करायचं मी ठरवलंय."

Web Title: Due to heavy rain, the series has been shot down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.