प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'माझी तुझी रेशीमगाठ' होणार नाही बंद, आजपासून शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:18 PM2022-09-16T12:18:49+5:302022-09-16T12:19:19+5:30

Mazi Tuzi Reshimgath:आता 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.

Due to the insistence of the audience, 'Mazi Tushi Reshimgath' will not be closed, the shooting will start from today | प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'माझी तुझी रेशीमगाठ' होणार नाही बंद, आजपासून शूटिंगला सुरूवात

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'माझी तुझी रेशीमगाठ' होणार नाही बंद, आजपासून शूटिंगला सुरूवात

googlenewsNext

झी मराठी(Zee Marathi)वरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ही मालिका अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे मालिकेचे चाहते नाराज झाले होते. मात्र आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे टीआरपीमध्ये टॉप टेनमध्ये असलेली मालिका माझी तुझी रेशीमगाठ संपणार नाहीये. इतकंच नाही तर आजपासून मालिकेच्या शूटिंगला सुरूवातही झाली आहे. 

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ' संपणार असल्याची माहिती समोर आली होती. नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज होताच आता माझी तुझी रेशीमगाठ संपणार असे प्रेक्षकांनी गृहीत धरले होते. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्यानंतर भावुक पोस्ट कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. या पोस्टनंतर अनेक प्रेक्षकांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले. सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात होती. या सगळ्याची दखल वाहिनी आणि निर्मात्यांनी घेतली आणि मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतला.

आता माझी तुझी रेशीमगाठ मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. आता ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता पाहता येणार आहे. मालिकेच्या अगदी शेवटच्या भागाचं शूटिंग झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तसे व्हिडीओही शेअर केले गेले. पण आता निर्माते आणि वाहिनीने निर्णय बदलल्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार आजपासून शूटिंगला सुरूवातही झाल्याचे समजते आहे.

Web Title: Due to the insistence of the audience, 'Mazi Tushi Reshimgath' will not be closed, the shooting will start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.