शाहरुख खानच्या 'डंकी'ने पहिल्याच दिवशी अॅडव्हानस बुकिंगमधून केली बक्कळ कमाई, रिलीज आधीच मालामाल झाला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:20 AM2023-12-18T09:20:42+5:302023-12-18T09:21:53+5:30
या वर्षातील डंकी हा किंग खानचा मोस्ट अवेडेट सिनेमा आहे.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' आणि 'जवान'नंतर 'डंकी' (Dunki) सिनेमा रिलीज होत आहे. या वर्षातील डंकी हा किंग खानचा मोस्ट अवेडेट सिनेमा आहे. 2023 वर्ष सुरु होताच शाहरुखने दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले तर आता वर्षाच्या शेवटी रिलीज होणाऱ्या 'डंकी' सिनेमाकडूनही त्याला अपेक्षा आहेत. तसंच या सिनेमातून शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानींसोबत काम करत आहे. 21 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या 'डंकी'चे १६ डिसेंबरपासून अॅडव्हानस बुकिंग सुरु झालं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे अॅडव्हान बुकिंगवरुन दिसून येतेय.
विशेष म्हणजे शाहरुख खानचा डंकी चित्रपट प्रभासच्या 'सालार पार्ट 1: सीझफायर'शी टक्कर देणार आहे आणि स्क्रीन नंबर्सला घेऊन या दोन चित्रपटांमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे. किंग खानच्या सिनेमाची अॅडव्हान बुकिंग सुरू होताच तिकीटांची झपाट्याने विक्री सुरू झाली. अवघ्या काही तासांत या चित्रपटाने अॅडव्हान बुकिंगमधून खूप जास्त पैसै कमावले. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून चार दिवस आहेत. अशा परिस्थितीत डिंकी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अनेक चित्रपटांना मागे टाकू शकतो, असे मानले जाते.
शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची क्रेझ रिलीज होण्याआधीच चाहत्यांमध्ये आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाचे अॅडव्हान बुकिं सुरू होताच पहिल्याच दिवशी तिकीटांचीही विक्रमी विक्री झाली. 'डंकी'च्या पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.
'सॅक निल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार 'डंकी'ची पहिल्या दिवशी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 1 लाख 44 हजार 186 तिकिट्स विकली आहेत. यासह 'डंकी'ने पहिल्याच दिवशी देशभरातून 4.45 कोटी रुपयांचे अॅडव्हान्स बुकिंग केले आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत आकडे आल्यानंतर यात थोडे बदल होऊ शकतात.