राजकीय उलथापालथीदरम्यान राणादासह या मराठमोळ्या कलाकारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 05:43 PM2023-07-03T17:43:20+5:302023-07-03T17:45:50+5:30

आता राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

During the political upheaval, these actors from the Marathi cine industry entered the Shiv Sena Shinde group | राजकीय उलथापालथीदरम्यान राणादासह या मराठमोळ्या कलाकारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

राजकीय उलथापालथीदरम्यान राणादासह या मराठमोळ्या कलाकारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

googlenewsNext

राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत असतानाच, रविवारी एक मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने भाजपा-शिवसेना युतीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या रूपाने राज्याला दुसरे उपमुख्यमंत्री मिळाले. दरम्यान आता राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिव चित्रपटसेनेच्या लोगोचे अनावरण पार पडले.

शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अक्षया देवधर, माधव देवचाके, आदिती सारंगधर, हार्दिक जोशी इत्यादी कलाकारांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कलाकारांसाठी खूप प्रामाणिकपणे काम करु

यावेळी हार्दिक जोशी म्हणाला की, कलाकार म्हणून आम्ही प्रेक्षकांसाठी काम करतच होतो. त्याच प्रामाणिकतेसोबत आम्ही कलाकारांसाठी काम करणार आहोत. प्रेक्षकांसाठी देखील करुच. माध्यमाची गरज असते. मला वाटते याच्यापेक्षा उत्तम माध्यम काय असेल तर ते शिंदे साहेब असतील. सुशांत शेलार दादा सोबत आहेत. मी लहानपणापासून हे कलाकार कसे घडले, हे बघत आलो आहे. अदिती ताईदेखील बरोबर होती. एवढे मोठेमोठे कलाकार बरोबर असताना तसेच शिंदे साहेबांचं मार्गदर्शन खूप कामी येणार आहे. चित्रपट सेना जी स्थापन केली आहे, त्यातून कलाकारांसाठी खूप प्रामाणिकपणे काम करु. 


अदिती सारंगधर म्हणाली की, गेली अनेक वर्ष बाहेरुन बघण्याचा योग आला. मला असं वाटतं की आपल्या लोकांसाठी, आपल्या माणसांसाठी लढायचं असेल तर आपल्या लोकांसोबत चालायला हवं. मला मनापासून असे वाटते शिंदे साहेब असे नेते आहेत जे अप्रॅचोबेल आहेत. कलाकारांसाठी समोरचा माणूस अप्रोचेबल असणे खूप महत्त्वाचे असते. आम्ही सगळे मिळून काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करू.    

Web Title: During the political upheaval, these actors from the Marathi cine industry entered the Shiv Sena Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.