सचिन आणि धोनीनंतर आता या खेळाडूवर येणार सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 01:10 PM2018-05-22T13:10:50+5:302018-05-22T13:10:59+5:30
सध्या झूलन गोस्वामी आणि माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावर आधारित सिनेमांची कामे सुरु आहेत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत काही क्रिकेटर्सवर बायोपिक करण्यात आले आहे. यातील काही सिनेमे हिट ठरले तर काहींना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या झूलन गोस्वामी आणि माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावर आधारित सिनेमांची कामे सुरु आहेत.
अशातच आता आणखी एका महान क्रिकेटरच्या जीवनावर सिनेमा येणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या जीवनाची कहाणी रुपेरी पडद्यावर बघालया मिळण्याची शक्यता आहे.
सगळंकाही ठिक झालं तर सौरव गांगुलीच्या या सिनेमाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सकडून करणार आहे. असे सांगितले जात आहे की, हा सिनेमा 'अ सेंचुरी इज नॉट इनफ' या पुस्तकावर आधारित असेल. या पुस्तकाचा सह-लेखक स्वत: सौरव गांगुली आहे.
गांगुलीनुसार, 'बालाजीसोबत माझी झाली आहे. पण अजून तरी काही फायनल झालेलं नाहीये'.
याआधी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यावर सिनेमे येऊन गेले आहेत.