सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकता म्हणाली- धन्यवाद....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:40 PM2020-06-17T19:40:30+5:302020-06-17T19:48:56+5:30
वकील सुधीर कुमार ओझा यांनी ही तक्रार दाखल केली.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर निर्माता एकता कपूरविरोधात मुझफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यावर एकता आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुझफ्फरपूरच्या कोर्टात 306, 109, 504 आणि 506 कलमां अंतर्गत एकता सह दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी ही तक्रार दाखल केली. ओझा यांनी आरोप लावले आहेत की, या सगळ्यांनी सुशांत सिंगला आत्महत्येला प्रवृत्त केले.
एकताने सोशल मीडियावर याचे उत्तर दिले आहे. सुशीला कास्ट न केल्याबाबत ही तक्रार दाखल केली आहे त्याबाबत धन्यवाद. खरं तर मीच त्याला लाँच केलं होते. मी या गोष्टीला घेऊन हैराण आहे की, हे वादग्रस्त मत किती दूरपर्यंत जाऊ शकते. कृपया कुटुंब आणि मित्रांना शांततेत दु:ख सहन करु द्या. सत्याचा विजय होईल. पण त्यावर विश्वास बसत नाही. "
सुशांत सिंग राजपूत हा मुळचा बिहारचा होता. त्याच्यावर अन्याय करण्यात आला. सुशांतकडून सात सिनेमे काढून घेण्यात आले. तसेच त्याच्या काही फिल्मस प्रकाशित होऊ दिल्या नाहीत. अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केल्याने सुशांतने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलल्याचा आरोप वकील सुधीर कुमार ओझा यांनी केला आहे.
-