म्हणून आजपर्यंत एकता कपूरने दाखवला नाही मुलाचा चेहरा, अखेर समोर आले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 11:47 AM2019-11-16T11:47:40+5:302019-11-16T11:53:51+5:30

रवीच्या जन्मानंतर त्याचा एकही फोटो फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात येऊ नये, याबद्दल एकता कमालीची सजग आहे.

Ekta kapoor reveals mom shobha kapoor said if i posts ravie pictures she will throw me out of the house | म्हणून आजपर्यंत एकता कपूरने दाखवला नाही मुलाचा चेहरा, अखेर समोर आले कारण

म्हणून आजपर्यंत एकता कपूरने दाखवला नाही मुलाचा चेहरा, अखेर समोर आले कारण

googlenewsNext

टीव्ही क्वीन एकता कपूरने लग्न न करता सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला होता. यावर्षी 27 जानेवारीला एकता आई बनली होती. एकताने रवी असे मुलाचे नामकरण केले होते. रवीच्या जन्मानंतर त्याचा एकही फोटो फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात येऊ नये, याबद्दल एकता कमालीची सजग आहे. त्यामुळेच इतक्या महिन्यात रवीचा एकही फोटो समोर आला नाही. 


बालदिनाच्या दिवशी एकता कपूरने वडील जितेंद्र आणि मुलगा रवी सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत देखील मुलाचा चेहरा एकताने दाखवलेला नाही. या व्हिडीओवर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मुलाचा चेहरा दाखव अशी कमेंट केली आहे. यावर एकता कपूने म्हटले आहे की, ''जर मी रवीचा चेहरा दाखवला तर माझी आहे मला घरातून काढून टाकेल.'  


एकताला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये टीव्ही आलेल्या एकता कपूर निर्मित ‘हम पांच’ या मालिकेने लोकप्रीयतेचा कळस गाळला. महिला गँगची ही मालिका लोकांना प्रचंड आवडली. या मालिकेची कल्पना एकताची होती. एकता व तिची आई शोभा कपूर यांनी साकारलेल्या बालाजी टेलिफिल्मने ही मालिका प्रोड्यूस केली आणि यानंतर एकताने कधीच मागे वळून पाहिले नाही.

एकताने चाळीशी ओलांडली आहे आणि आजपर्यंत तिने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत. पण हम पांच , क्यों की सांस भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की आणि नागीन या पाच मालिकांनी एकताला ‘टीव्हीची क्वीन’ बनवले

Web Title: Ekta kapoor reveals mom shobha kapoor said if i posts ravie pictures she will throw me out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.