CoronaVirus: एकताने पुढे केला मदतीचा हात, नाकारला एक वर्षाचा पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:54 PM2020-04-04T12:54:03+5:302020-04-04T13:02:22+5:30
एकताने ट्विटरवर ऑफिशल स्टेटमेंट दिले आहे
भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 2,567 वर पोहोचली आहे; तर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. निर्माती एकता कपूर तिचा एक महिन्यांचा पगार घेणार नाही आहे. एकताने ट्विटरवर ऑफिशल स्टेटमेंट दिले आहे.
The only way ahead, is together! #StaySafeStayHealthypic.twitter.com/OGpygoclXZ
— Ekta Kapoor (@ektarkapoor) April 3, 2020
एकता लिहिते, माझ्या कंपनीत काम करणार्या सर्व फ्रिलांसर आणि कामगारांची काळजी घेणे ही माझी मुख्य जबाबदारी आहे. ''शूटिंग न केल्यामुळे त्यांचे बरेच नुकसान होत आहे. मी माझा एक वर्षाचा पगार घेणार नाही, म्हणजे अडीच कोटी रुपये. जेणेकरून या लॉकडाउनच्या कठीण काळात माझ्या सहका-यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. सध्या पुढे जाण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे एकत्र चालणे.''
In times like these, we’ve all got to come together. Every contribution, big or small counts. Together, we can and we will tide over this and emerge as a stronger & healthier nation 🙏🏻 #PMCaresFundhttps://t.co/XCoVdR0uUq
— Ekta Kapoor (@ektarkapoor) March 28, 2020
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शुक्रवारी त्याचा आगामी सिनेमा राधेच्या शूटिंग शिवायच क्रू मेबर्सना त्यांचा महिन्याचा पगार दिला आहे. याआधी ही सलमाने २५ हजार कामगारांची मदत केली आहे. दीपिका-रणवीर, अक्षय कुमार, आयुषमान खुराना, कार्तिक आर्यन, विकी कौशल, अजय देवगण यांनी याआधीच आपला मदतीचा हात पुढे केली आहे.