मानसीच्या लग्नात ढसाढसा रडली ही मराठमोठी अभिनेत्री, कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:18 PM2021-01-19T13:18:57+5:302021-01-19T13:22:02+5:30

मानसी नाईकच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नववधू मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.

Emotional Deepali Sayyed Break Down After Mansi Naik Wedding | मानसीच्या लग्नात ढसाढसा रडली ही मराठमोठी अभिनेत्री, कोण आहे 'ती'?

मानसीच्या लग्नात ढसाढसा रडली ही मराठमोठी अभिनेत्री, कोण आहे 'ती'?

googlenewsNext

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नाच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. अखेर तो क्षण आला आणि  रेशीमगाठीत अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.  इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासह तिचं शुभमंगल नुकतंच  पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. 

 

मानसीच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत.  या फोटोंमध्ये नववधू मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती  शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. मात्र या लग्नसोहळ्यामध्ये मानसीची खास मैत्रिण अभिनेत्री दिपाली सय्यदनेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले. लग्न पार पडताच दिपालीला नववधू रुपात मानसीला पाहून अश्रु अनावर झाले होते. 

दिपाली सय्यदने इंस्टाग्रामवर मानसी नाईक सोबतचे फोटो शेअर करत लिहिले होते की, प्रिय मनू, आपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास, तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही, आज संसारात वावरताना, मैत्रीण, आई, मुलगी, बहिण अशा कित्येक नात्यात वावरताना आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात एकमेकांच्या मागे, खंबीरपणे उभ राहून एकमेकांना साथ दिली...!

 

 

आपली मैत्री म्हणजे आयुष्यातील अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा ठेवा ...मनू लवकरच तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे ... मी तुम्हा दोघांनाही सुखी संसारासाठी शुभेच्छा देते. शेवटी एकच लिहावंसं वाटतं !!कायम आनंदी रहा मनू दिल्या घरी तू सुखी राहा.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिले होते.

Web Title: Emotional Deepali Sayyed Break Down After Mansi Naik Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.