काळ आणि पिढय़ांचे भावनिक नाते!

By Admin | Published: November 22, 2014 10:34 PM2014-11-22T22:34:34+5:302014-11-22T22:34:34+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पिढीने जुलुमी राजवटीच्या विरोधातल्या क्रांतीचा अनुभव घेतला आहे. ती पिढी अन्यायाविरोधात त्वेषाने लढली आणि तिने स्वातंत्र्य मिळवून दिले.

Emotional relationship of time and generations! | काळ आणि पिढय़ांचे भावनिक नाते!

काळ आणि पिढय़ांचे भावनिक नाते!

googlenewsNext
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पिढीने जुलुमी राजवटीच्या विरोधातल्या क्रांतीचा अनुभव घेतला आहे. ती पिढी अन्यायाविरोधात त्वेषाने लढली आणि तिने स्वातंत्र्य मिळवून दिले. पण हा धगधगता इतिहास आजच्या पिढीला केवळ पुस्तकाच्या पानांतूनच अनुभवायला मिळतो. या क्र ांतीचा अनुभव नव्या पिढीर्पयत पोहोचवण्याचे कार्य ‘विटीदांडू’ हा चित्रपट तर करतोच; परंतु ते करताना हा चित्रपट आजोबा आणि नातवाच्या भावनिक नात्यातून ही गोष्ट सांगत विटीदांडू या खेळाच्या माध्यमातून वर्तमानाचे भूतकाळाशी नातेही जोडतो. 
मोरगाव नामक खेडय़ातले एक आजोबा, म्हणजे दाजी हे त्यांचा नातू गोविंदसह जीवन व्यतीत करीत असतात. दाजींचा मुलगा आणि सून यांनी क्रांतीच्या लढय़ात बलिदान दिलेले असते. त्यामुळे नातवाची जबाबदारी दाजींवर येऊन पडते. पण गावात दाजींबद्दल चांगले बोलले जात नाही, याचे कारण म्हणजे दाजींना इंग्रज राजवटीविषयी असलेला आदर. पण क्रांतीच्या लढय़ात मुलगा मारला गेल्याचे दु:ख गाठीशी असल्याने त्याची झळ नातवाला लागू नये, यासाठी दाजींची पराकाष्ठा सुरू असते. गोविंद विटीदांडूच्या खेळात पारंगत आणि त्याच्या याच खेळाच्या माध्यमातून एका इंग्रज अधिका:याला प्राणाला मुकावे लागते. परिणामी दाजी आतार्पयत जे काही टाळण्याचा आटापिटा करीत होते, तेच अगदी त्यांच्या पुढय़ात येऊन उभे ठाकते. ही घटना संपूर्ण गावावर परिणाम करणारी ठरते व इथून सुरू होणारा आजोबा आणि नातवाचा नवा संघर्ष हा चित्रपट पडद्यावर मांडतो.
या चित्रपटाची कथा लिहिताना लेखक विकास कदमने वर्तमानातले आजोबा आणि नातवाच्या संवादमाध्यमातून ती वदवली आहे. हे आजोबा म्हणजेच त्या वेळचा छोटा गोविंद याचा उलगडा पुढे होत जातो. ही गोष्ट रंगवत नेण्याची चांगली कामगिरी विकासने पार पाडली आहे. एकीकडे क्रांतीची दाहकता आणि दुस:या बाजूला नात्यातल्या भावनांची गुंफण त्याने घातली आहे. दिग्दर्शक गणोश कदमच्या समोर एकाचवेळी क्र ांतीची धग आणि तरल नात्यांचे बंध उलगडून दाखवण्याचे आव्हान होते व ते त्याने सक्षमतेने पेलले आहे. कलाकारांकडून उत्तम ते सर्व काढून घेत गणोशने ठसठशीत व्यक्तिरेखा पडद्यावर मांडल्या आहेत. चित्रपटाच्या शीर्षकाशी सतत संबंध राखत अगदी शेवटर्पयत त्याने विटीदांडूचा करून घेतलेला उपयोग लक्षणीय आहे. मात्र शेवटच्या प्रसंगात आकाशात घोंघावणा:या विटय़ा किंवा इंग्रजी अधिका:याच्या हातात घुसणारी विटी हे प्रसंग साधारण वाटतात. चित्रपटाचे कॅमेरावर्कनजरबंदी करणारे आहे आणि लोकेशन्स दृष्टी खिळवून ठेवणारी आहेत. 
सर्वच कलावंतांचा अभिनय हा या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. दिलीप प्रभावळकर यांनी दाजींच्या भूमिकेत भरलेले रंग भन्नाट आहेत. त्यांचा दाजी अनुभवण्याजोगा आहे. छोटय़ा गोविंदच्या भूमिकेत निशांत भावसार याने दमदार कामगिरी केली असून, त्याची ही भूमिका त्याच्या कारकिर्दीसाठी आश्वासक ठरू शकेल. अशोक समर्थ यांचे स्त्री-वेषातले भारु ड लक्षात राहते. तर विकास कदमने रंगवलेला क्रांतिकारी चांगला वठला आहे. रवींद्र मंकणी, यतीन कार्येकर, मृणाल ठाकूर, शुभंकर अत्रे आदी कलावंतांच्या भूमिका जमून आल्या आहेत. एकूणच पूर्वसूरींचे स्मरण करून देणा:या, नातेसंबंध दृढ करणा:या तसेच मैदानी खेळाचे महत्त्व पटवून देणा:या या चित्रपटाचा उद्देश प्रशंसनीय म्हणावा लागेल.

 

Web Title: Emotional relationship of time and generations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.