मनोरंजन न करणारा ‘एंटरटेनमेंट’

By Admin | Published: August 8, 2014 11:45 PM2014-08-08T23:45:03+5:302014-08-08T23:45:03+5:30

ज्या चित्रपटाचे नावच ‘एंटरटेनमेंट’ आहे, त्याकडून प्रेक्षकांना मनोरंजनाची अपेक्षा ही असणारच. पण, अक्षय कुमारच्या ‘एंटरटेनमेंट’ या चित्रपटाने पुरते निराश केले आहे.

Entertaining 'Entertainment' | मनोरंजन न करणारा ‘एंटरटेनमेंट’

मनोरंजन न करणारा ‘एंटरटेनमेंट’

googlenewsNext
>ज्या चित्रपटाचे नावच ‘एंटरटेनमेंट’ आहे, त्याकडून प्रेक्षकांना मनोरंजनाची  अपेक्षा ही असणारच. पण, अक्षय कुमारच्या ‘एंटरटेनमेंट’ या चित्रपटाने पुरते निराश केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणा:या जोडीने याआधी अनेक चांगले विनोदी चित्रपट दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट बघितल्यावर रसभंगच होतो. 
मालकाशी निष्ठावान असलेला कुत्र त्याच्या निधनानंतर चक्क करोडपती होतो, यावर चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. अखिल (अक्षय कुमार) मुंबईत गरिबीत आपले आयुष्य व्यतीत करत असतो. बँकॉकला राहणारे व्यावसायिक पन्नालाल (दलीप ताहिल) हे आपले वडील असल्याचे त्याला कळते. तसेच त्यांची तीन हजार कोटींची मालमत्ता असून, त्यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याचेही समजते. आपल्या वडिलांची मालमत्ता मिळवण्यासाठी अखिल बँकॉकला पोहोचतो. तिथे गेल्यावर अखिलला वडिलांनी संपूर्ण मालमत्ता एका कुत्र्याच्या नावाने केल्याचे कळते. त्या कुत्र्याने पन्नालालचे अनेकदा प्राण वाचवलेले असतात. त्यामुळे संपत्ती त्याला मिळाली हे कळल्यावर अखिल त्या कुत्र्याला मारून टाकण्याचे ठरवतो.  दरम्यान, बँकॉकमध्येच तुरुंगात बंद असलेल्या पन्नालालच्या चुलतभावांची करण-अजरुन (प्रकाश राज-सोनू सूद) शिक्षा संपते. तिथून बाहेर आल्यावर ते कोर्टाकडून पन्नालालच्या मालमत्तेवर कब्जा मिळवतात. आपल्या वडिलांच्या निष्ठावान कुत्र्याला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे, असे अखिलला वाटते. त्यासाठी तो करण-अजरुनशी मुकाबला करतो. शेवटी पन्नालालच्या योग्य वारसांना त्यांची मालमत्ता मिळते.
उणिवा - रोहित शेट्टीच्या चित्रपटांचे लेखक म्हणून साजिद-फरहाद जोडी प्रसिद्ध होती. त्यांनी अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. त्यामुळे ही जोडी दिग्दर्शनात उतरल्यावर त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण चित्रपट पाहिल्यानंतर पुरता अपेक्षाभंग झाला आहे. या जोडीने चित्रपटासाठी अत्यंत सुमार कथा निवडली. पटकथेचा वापर करत कथेला मनोरंजक बनवता येऊ शकत होते. पण तसे प्रयत्नही त्यांनी केले नाहीत. चित्रपटात दिग्दर्शक गोंधळलेला वाटतो. अक्षय कुमारला की कुत्र्याला हीरो करायचे या गोंधळात ते दोघेही हीरो वाटत नाहीत. अभिनयाबाबतीत अक्षय कुमारने पुन्हा एकदा पुरती निराशा केली आहे. फक्त आरडाओरडा करणो म्हणजे विनोदी भूमिका असा त्याचा समज झाला आहे. संपूर्ण चित्रपटात फक्त साहसदृश्यांमध्येच तो चांगला वाटतो. तमन्ना फक्त नावालाच अभिनेत्री आहे. ग्लॅमरची गरज ती जरा जास्तच पूर्ण करते. विनोदी चित्रपटासाठी जेवढा हावभाव नेहमीच जॉनी लिव्हर करत आलाय, तेवढा याही चित्रपटात केला आहे. प्रकाश राज आणि सोनू सूद यांची भूमिका अतिशय वाईट आहे. त्यांना नक्की कसे वागायचे आहे याचा त्यांनाच उलगडा न झाल्याने त्यांचाही पुरता गोंधळ झाला आहे. मिथुन चक्रवर्तीही ठीकच. पाहुण्या कलाकारांमध्ये रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, वज्रेश हिरजी, दलीप ताहिल, दर्शन जरीवाला, डान्स मास्टर रेमो यांनी प्रभाव पाडलेला नाही.
वैशिष्टय़े - कुत्र हा चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. त्याने उत्कृष्ट काम केले आहे. अक्षय कुमारच्या मित्रच्या भूमिकेतील कृष्णाने चित्रपटात मजा आणली आहे. संवादातून लयबद्ध अंदाजात त्यांनी चित्रपट कलाकारांची घेतलेली नावे बघण्यात मजा येते. 

Web Title: Entertaining 'Entertainment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.