निवडणुकीच्या मैदानात 'प्रभू रामचंद्रां'ची एंट्री; जाणून घ्या, किती आहे अरुण गोविल यांची एकूण संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 03:19 PM2024-03-25T15:19:42+5:302024-03-25T15:20:49+5:30

अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी मेरठ जिल्ह्यात झाला, मात्र त्यांचे बालपण शाहजहांपूरमध्ये गेले. अरुण गोविल यांनी रामायण मालिकेशिवाय इतरही अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती रामायण मालिकेने.

Entry of 'Prabhu Ramachandra' in the election field actor Arun govil to contest election from meerut on bjp ticket know about his networth | निवडणुकीच्या मैदानात 'प्रभू रामचंद्रां'ची एंट्री; जाणून घ्या, किती आहे अरुण गोविल यांची एकूण संपत्ती

निवडणुकीच्या मैदानात 'प्रभू रामचंद्रां'ची एंट्री; जाणून घ्या, किती आहे अरुण गोविल यांची एकूण संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जारी करताना दिसत आहेत. यातच भाजपने आपल्या 111 उमेदवारांची पाचवी यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात पक्षाने रामायण या लोकप्रिय टीव्ही मालिकेत प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनाही मेरठमधून उमेदवारी दिली आहे. रामायण मालिकेमुळे अरुण गोविल हे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाले होते. एवढेच नाही, तर लोक त्यांचे फोट घरात लावून त्याची पुजा देखील करत होते.

अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी मेरठ जिल्ह्यात झाला, मात्र त्यांचे बालपण शाहजहांपूरमध्ये गेले. अरुण गोविल यांनी रामायण मालिकेशिवाय इतरही अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती रामायण मालिकेने. तर जाणून घेऊयात, किती आहे अरुण गोविल यंची एकूण संपत्ती, रामायणाच्या एक अॅपिसोडसाठी ते किती रुपये घ्यायचे? यासंदर्भात...

अरुण गोविल यांनी रामायण शिवाय इतरही अनेक मालिकांमध्ये काम केले. यात विक्रम और बेतालचाही समावेश आहे. ते नुकतेच 'आर्टिकल 370' मध्येही दिसून आले होते. एकीकडे रामायण मालिकेने प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे नुकसानही झाले. यामुळे फिल्ममेकर्स त्यांना कास्ट करत नव्हते. त्यांना प्रभू रामचंद्रांच्या छबीमुळे रोल्स मिळत नव्हते. माध्यमांतील वृत्तांनुसार, अरुण गोविल यांना 'रामायण'च्या प्रत्येक अॅपिसोडसाठी अंदाजे 51 हजार रुपये मानधन देण्यात आले होते. या मालिकेचे एकूण 81 भाग प्रसारित झाले. यानुसार त्यांना अंदाजे 40 लाख रुपये एवढे मानधन मिळाले असावे.

अरुण गोविल यांची एकूण संपत्ती - 
रामानंद सागर यांच्या रामाय या मालिकेमुळे प्रसिद्ध झाल्यानंतर अरुण गोविल यांच्या मानधनात 25 टक्क्यांची वाढ झाली होती. यामुळे 'ओह माय गॉड 2' मध्ये त्यांना 50 लाख रुपये एवढे मानधन देण्यात आले होते. मात्र यात त्यांचा रोल फार थोडा होता. माध्यमांतील वृत्तांनुसार अरुण गोविल यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये एवढी आहे. अरुण गोविल यांनी 2022 मध्ये Mercedes Benz C-Class विकत घेतली होती. हिची किंमत जवळपास 60 लाख रुपये सांगण्यात आली होती. खरे तर, गेल्या काही वर्षांत त्यांच्या एकूण संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. 

एका वृत्तानुसार, अरुण गोविल वर्षाला 4 लाख रुपये आणि महिन्याला 32 हजार रुपये कमावतात. अॅक्टिंग आणि जाहिराती, ही त्यांच्या कमाईची मुख्य साधने आहेत. मुंबईमध्ये अरुण गोविल यांचे स्वतःचे घर आहे. ते येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी श्रीलेखा गोविल, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा बँकेत नोकरी करतो. तर मुलगीही शिक्षण घेत आहे.

Web Title: Entry of 'Prabhu Ramachandra' in the election field actor Arun govil to contest election from meerut on bjp ticket know about his networth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.