‘रेती’तून पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश

By Admin | Published: April 11, 2016 12:55 AM2016-04-11T00:55:22+5:302016-04-11T00:55:22+5:30

वास्तववादी कथानक आणि सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या ‘रेती’ चित्रपटातील सामाजिक संदेशाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे

Environmental protection social message from 'sand' | ‘रेती’तून पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश

‘रेती’तून पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश

googlenewsNext

वास्तववादी कथानक आणि सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या ‘रेती’ चित्रपटातील सामाजिक संदेशाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. मनोरंजनातही तितकाच खरा उतरलेल्या ‘रेती’मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बेकायदा आणि अनिर्बंध सुरू असलेला वाळूउपसा, मनगटशाहीच्या जोरावर हा धंदा करणाऱ्यांच्या मागचे राजकारण्यांचे छुपे हात, या बेलगाम धंद्याचा काळापट, दमदार कथा माध्यमातून विणला आहे.
‘रेती’ हा चित्रपट हा वेगळा आशय घेऊन आलेला आहे त्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रेती हा चित्रपट वाळूमाफिया चित्रपटाला धरून असल्यामुळे त्या चित्रपटातील दाहकता प्रेक्षकांना जास्त भावत असेल, निर्मात्याने अशा वेगळ््यय विषयावर चित्रपट तयार करण्याचे धाडस केले त्यामुळे त्यांचे कौतुक करू तेवढे थोडेच आहे. रेती या चित्रपटामुळे सरकारी अधिकाऱ्यांबद्दलचा सकारात्मक मेसेज लोकांपर्यंत पोहोचत आहे. तसेच पर्यावरणाबद्दलची जनजागृतीही या चित्रपटामुळे होताना दिसत आहे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे हीच आमची इच्छा आहे.- अरुण रहाणे, कला दिग्दर्शक
प्रेक्षकांना ‘रेती’ हा चित्रपट आवडल्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, वाळूमाफियांवर आधारित ज्वलंत विषय रेती या चित्रपटातून मांडण्यात आलेला आहे. प्रेक्षकांच्याही आवडी-निवडीही दिवसेंदिवस बदलत चालल्या आहेत. त्यांना एकाच साच्यातले चित्रपट पाहण्यापेक्षा वेगळ्या आशयाचे समाजातील वास्तवदर्शन दाखविण्यात आलेले विषय पाहायला जास्त आवडत आहे आणि तेच काम आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे.
- सुहास भोसले, दिग्दर्शक
‘रेती’ या चित्रपटाची हाताळणी छान केली आहे. हा चित्रपट तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले आहेत. आपण चित्रपटाच्या माध्यमातून प्रश्न जरी सांगितले तरी त्यांची उत्तरे प्रेक्षकांनी शोधणे अपेक्षित असते. हीच उत्तरे आज प्रेक्षक शोधताना दिसत आहे. आजचा प्रेक्षकसुद्धा चोखंदळ झाला आहे. त्याला वेगळे विषय नेहमी पाहायला आवडतात आणि आम्ही त्यांच्या आवडीनिवडी जाणून तसेच चित्रपट आणण्याचा प्रयत्न करतो. - सुहास पळशीकर, अभिनेता

Web Title: Environmental protection social message from 'sand'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.