Esha Deol Divorce: ईशा देओल-भरत यांची फिल्मी Lovestory, टिश्यू पेपरवरुन झाली सुरुवात; आता मोडला संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:36 PM2024-02-06T19:36:03+5:302024-02-06T19:38:41+5:30
हेमा मालिनीच्या लेकीचा १२ वर्षांचा संसार मोडला.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधून आणखी एका कपलच्या घटस्फोटाची चर्चा होती. ती जोडी म्हणजे हेमा मालिनी यांची लेक ईशा (Esha Deol) आणि पती भरत तख्तानी (Bharat Takhtani). दोघांनी आता घटस्फोट घेत असल्याचं कन्फर्म केलं आहे. ईशाचा १२ वर्षांचा संसार मोडला आहे. 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांची ईशा ही मोठी मुलगी आहे. 2012 साली तिने उद्योगपती भरत तख्तानीसोबत लग्न केले. टिश्यु पेपरमुळे त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. त्यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
अन् दोघं प्रेमात पडले
ईशा देओल आपल्या लव्हस्टोरीबाबत सांगताना म्हणाली होती की, "टीनएज मध्येच मी आणइ भरत एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. मी मुंबईतील एका शाळेत होते तेव्हा माझ्या दातांना ब्रेसेस लावले होते. तर भरत बांद्रामधील एका अॅकॅडमीत होते. त्या अॅकॅडमीत खूपच गुडलुकिंग मुलं शिकतात असं तेव्हा कॉलेज तरुणांमध्ये गॉसिप असायचं. आम्ही दोघं आंतरशालेय शालेय स्पर्धेवेळी भेटलो. माझ्याच शाळेने ती स्पर्धा आयोजित केली होती."
ती पुढे म्हणाली, "मी भरतला माझा मोबाईल नंबर तेव्हा एका टिश्यू पेपरवर लिहून दिला होता. मला कायम माहित होतं की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याला मी आवडायचे.कॉलेजच्या दिवसांपर्यंत मी त्याच्या संपर्कात होते. मात्र बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर मी व्यस्त झाले. आमच्याकडे एकच फोन होता जो आईच्या खोलीत असायचा. त्यामुळे तेव्हा भरतशी बोलणं कठीण होतं. नंतर आम्ही दोघंही आमच्या आमच्यात कामात अडकलो. पण मला आनंद आहे की आम्ही परत एकमेकांना भेटलो आणि थेट लग्न केलं. आज तो माझा पार्टनर आहे."
एक दिवस भरतने ईशाचा हात पकडल्यानंतर तिला राग आला होता. तिने भरतला जोरदार कानाखाली वाजवली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणं बंद झालं होतं. नंतर १० वर्षांनी दोघंही परदेशात एकमेकांसमोर आले. तेव्हा भरतने तिला पुन्हा हात पकडण्याविषयी विचारलं आणि मग तो हात कधीच सोडला नाही."
ईशा आणि भरतने आता आपला १२ वर्षांचा संसार मोडला आहे. त्यांना राध्या आणि मियारा या दोन मुली आहेत.