"माझ्या आईला काम द्या..." हेमा मालिनींच्या कमबॅकवर लेक ईशा देओलचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:12 PM2023-09-15T13:12:50+5:302023-09-15T13:15:02+5:30

जर कोणाकडे माझ्या आईसाठी चांगली भूमिका असेल तर...

esha deol asks work for mother hema malini says she is wishing to do comeback | "माझ्या आईला काम द्या..." हेमा मालिनींच्या कमबॅकवर लेक ईशा देओलचं भाष्य

"माझ्या आईला काम द्या..." हेमा मालिनींच्या कमबॅकवर लेक ईशा देओलचं भाष्य

googlenewsNext

'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) यांनी ७० ते ८० चा काळ गाजवला. अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. त्यांचा कमालीचा अभिनय बघून त्यांना सिनेमात घेण्यासाठी निर्मात्यांच्या रांगा लागायच्या. धर्मेंद्र, अमिताभ बच्चनसह अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या बरोबरीने त्यांनी तोडीस तोड भूमिका साकारली. आजही वयाची सत्तरी पार केल्यानंतरही हेमा मालिनी अतिशय फिट असून त्यांचं सौंदर्यही कमी झालेलं नाही. पण हेमाजी परत मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची चाहते प्रतिक्षा करत आहेत. नुकतंच त्यांची लेक ईशा देओलने (Esha Deol) आईला काम द्या असं म्हटलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

ईशा देओलने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आई हेमा मालिनी यांच्या कमबॅकविषयी भाष्य केले. ती म्हणाली,'मी तर कधीपासून सांगत आहे. तिलाही पुन्हा काम करायचं आहे . सध्या ती काही स्क्रीप्ट्स वाचत आहे. चांगल्या भूमिका ती शोधत आहे. ती अशी व्यक्ती आहे की काही चांगलं मिळालं तरच करेल आणि कॅमेरासमोर येईल. जर कोणाकडे माझ्या आईसाठी चांगली भूमिका असेल तर प्लीज तिच्याशी संपर्क साधा.'

ती पुढे म्हणाली, 'माझे वडील धर्मेंद्र यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमाच्या शूटिंगपूर्वी सर्वांशी चर्चा केली होती. जेव्हा ते नवीन प्रोजेक्टमध्ये काम करतात तेव्हा लुक टेस्ट आणि कॉस्च्युमचे फोटो अवश्य पाठवतात.'

ईशा देओलची शॉर्ट फिल्म 'एक दुआ' ला नुकतंच ६९ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारमध्ये नॉन फीचर फिल्म कॅटेगरीत मेन्शन करण्यात आले. २०२१ साली 'एक दुआ' ही शॉर्ट फिल्म रिलीज होती. ईशाला शेवटचं '
हंटर:टूटेगा नही तोडेगा' या वेबसिरीजमध्ये पाहिलं गेलं. यामध्ये सुनील शेट्टीचीही भूमिका होती. ती लवकरच 'रुद्र:द एज ऑफ डार्कनेस' मध्ये अजय देवगणसोबत दिसणार आहे.

Web Title: esha deol asks work for mother hema malini says she is wishing to do comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.