"काही गोष्टी कधीच सांगणार नाही..." सावत्र भावांबरोबरच्या नात्यावर ईशा देओल स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 10:45 AM2023-09-13T10:45:15+5:302023-09-13T10:46:43+5:30
काही अशा गोष्टी आहेत ज्यावर मी बोलू इच्छित नाही.
बॉलिवूडमध्ये सध्या देओल कुटुंब प्रसिद्धीझोतात आलं आहे. आधी सनी देओलच्या (Sunny deol) मुलाचं लग्न पार पडलं. या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली दिसल्या नाहीत. त्यानंतर करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आजमी यांचा किसींग सीन गाजला. तर नुकताच सनी देओलचा 'गदर 2' ने तुफान यश मिळवलं. सिनेमाच्या यशानिमित्त चक्क सावत्र बहीण ईशा देओलने खास स्क्रीनिंग ठेवली. अनेक वर्षांनी देओल सावत्र भाऊ बहिणींना एकत्र पाहिलं गेलं. ईशा देओलने (Esha Deol) एका मुलाखतीत सावत्र भावांसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओल म्हणाली, 'काही अशा गोष्टी आहेत ज्यावर मी बोलू इच्छित नाही. कंटेंटसाठी माध्यम लोकांना आवडेल ते लिहितात. ते त्यांचं काम करत आहेत. मी कधीच त्याकडे लक्ष देत नाही. मी नेहमीच याबद्दल जागरुक राहिली आहे. मला माहितीए की नेहमीच आमच्याबद्दल चर्चा होत असतात.'
ती पुढे म्हणाली, 'काही गोष्टी आहेत ज्याबद्दल आम्ही बोलू शकतो आणि काही गोष्टींबद्दल आम्हाला बोलायचं नसतं. भलेही किती जरी आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही या मुद्द्यांवर बोलणार नाही. आम्ही काही गोष्टी मौन बाळगून आहोत त्यावर आम्ही ठामही आहोत. त्यामुळे जे बोलायचं ते आम्ही बोलतोच.'
ईशाचं सनी आणि बॉबीसोबत जवळचं नातं आहे. ती त्यांना राखीही बांधते. पण सोशल मीडियावर पोस्ट करायला त्यांना आवडत नाही. हेमा मालिनींनीही खुलासा करत सांगितलं की आम्ही आधीपासूनच सोबत आहोत. हे तर लोकांनी पसरवलेल्या अफवा होत्या. सनी आणि बॉबी अनेकदा हेमा मालिनींच्या घरी जातात. नुकतंच त्यांनी 'गदर 2'चीही स्तुती केली.