युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलला १ नोव्हेंबरपासून होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 07:46 PM2021-10-30T19:46:28+5:302021-10-30T19:47:01+5:30

बहुप्रतीक्षित २६ वा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल १ नोव्हेंबरपासून आपल्या डिजिटल रूपात सुरू होत आहे.

The European Union Film Festival will start on November 1 | युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलला १ नोव्हेंबरपासून होणार सुरूवात

युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलला १ नोव्हेंबरपासून होणार सुरूवात

googlenewsNext

युरोपमध्ये डोकावण्यासाठी खिडकी देणारा, बहुप्रतीक्षित २६ वा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल १ नोव्हेंबरपासून आपल्या डिजिटल रूपात सुरू होत आहे. या फेस्टिव्हलमध्ये असामान्य, पुरस्कार विजेते युरोपियन सिनेमे, प्रेरणादायी कथा असे बरेच काही आपल्याला घरीच राहून अनुभवता येणार आहे. हा फेस्टिवल युरोपियन सिनेमा आणि संस्कृतीची वैविध्यता व सखोलता साजरा करणारा आहे. या फेस्टिव्हलचे आयोजन डेलिगेशन ऑफ द युरोपियन युनियन टु इंडिया, सदस्य राज्ये, सहकारी देशांद्वारे भारतीय व युरोपियन भागिदारांच्या मदतीने केले जाणार आहे.
  
या महिनाभर चालणार असलेल्या फेस्टिव्हलमध्ये ८ वेगवेगळ्या विभागांतील ३७ भाषांतील ६० सिनेमे पाहायला मिळतील. हे सिनेमे २७ सदस्य राज्ये, सहकारी देशांतील अनोख्या कथा इतिहास कलात्मकतेने गोष्टीरूपात सादर करतील व कान्स, लोकार्नो, सॅन सबॅस्टियन, कारलोव्ही व्हेरी आणि व्हेनिस येथे मिळालेला सिनेमॅटिक विजय साजरा करतील. या फेस्टिव्हलमध्ये प्रख्यात भारतीय दिग्दर्शक सत्यजीत रे यांचा पथेर पांचाली दाखवून त्यांना १०० व्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहिली जाईल. धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलने खास, आधुनिक भारतीय विभाग तयार केला असून त्यात हिंदी, मराठी, मल्याळम आणि बंगाली या चार भारतीय अधिकृत भाषांमधले सहा सिनेमे दाखवले जातील.  
या फेस्टिव्हलमध्ये प्रत्येक सिनेमाप्रेमीसाठी काहीतरी देण्यात येत आहे. त्यामध्ये आधुनिक युरोपियन सिनेमापासून युरोपियन सिनेमातले दिग्गज, सहनिर्मिती, निवडक शॉर्ट फिल्म्स, वातावरण बदलावर आधारीत सिनेमे, सिनेमाचे शिक्षण, आधुनिक भारतीय सिनेमे, ऐतिहासिक भारतीय सिनेमांपर्यंत आठ विभागांचा समावेश आहे. ईयूएफएफद्वारे दुसऱ्या सिनेमा रित्रोव्हातो फेस्टिवलच्या सहकार्याने या खंडात बनलेले प्राथमिक आणि ऐतिहासिक ठरलेले, डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेले सिनेमे नवे प्रेक्षक व पिढ्यांना दाखवून युरोपचा असामान्य सिनेमॅटिक वारसा साजरा केला जाईल. 
ईयूएफएफचे महत्त्व विशद करताना युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत एच. ई. उगो अस्तुतो म्हणाले, युरोपियन फिल्म फेस्टिवलच्या २६व्या आवृत्तीमध्ये प्रेक्षकांना युरोप जाणून घेण्याची, कथाकारांच्या नजरेतून युरोपचा प्रवास करण्याची संधी मिळेल. आमच्या गेल्या आवृत्तीला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर युरोप तसेच भारतातील क्लासिक सिनेमांसाठी वेगळा विभाग परत समाविष्ट केला जाणार आहे. प्रेक्षक या महिनाभर चालणाऱ्या फेस्टिव्हलचा आनंद घेतील अशी आशा आहे.’
 

Web Title: The European Union Film Festival will start on November 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.