या कलाकरांच्या परफॉर्मन्सने रंगीली बॉलीवूड म्युझिकची संध्याकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:33 PM2018-10-23T16:33:40+5:302018-10-23T16:53:49+5:30

हंगामा बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टची चौथा सीझन नुकताच मुंबई झाला. या महोत्सवात दोन दिवसात 60+ कलाकारांनी आपली कला सादर केली.

The evening of colorful Bollywood music by the performances of these artists | या कलाकरांच्या परफॉर्मन्सने रंगीली बॉलीवूड म्युझिकची संध्याकाळ

या कलाकरांच्या परफॉर्मन्सने रंगीली बॉलीवूड म्युझिकची संध्याकाळ

googlenewsNext

स्कोडा ऑटो प्रस्तुत हंगामा बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टची चौथा सीझन नुकताच मुंबई झाला. या महोत्सवात दोन दिवसात  60+ कलाकारांनी आपली कला सादर केली. तरुणाच्या गळ्यातील ताईत बनलेले जावेद अली स्टेजवर येताच त्याच्या चाहत्यांंमध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जावेदने  जोधा अकबरमधील जश-ए-बहारा, गझनीमधील गुजारीश, बजरंगी भाईजानचे तू जो मिला, तुम मिले’तील अशी एकापेक्षा एक गाणी गात उपस्थित सगळ्यांची मनं जिंकली. 
 
पहिल्या दिवशीची संध्याकाळ तर महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेल्या अजय-अतुल यांनी रंगवली. आपल्या शैलीत अजय-अतुल द्वयीने श्री गणेशाच्या गाण्याने सुरुवात केली. त्यानंतर “गोंधळ” सादर केला. याठिकाणी जमलेल्या प्रेक्षकांचा उत्साह इतका होता की, अजय-अतुल यांनी दशकातील सैराट सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय गाणे यड लागला सादर केले. 
 
दुसऱ्या दिवशी मिथुनने आपल्या गायकीच्या जोरावर तरुणांना ताल धरायला लावले. सोनू कक्कर, टिनू कक्कर आणि शिल्पा राव यांनी एकत्र येऊन एक वेगळाच माहोल तयार केला. आजच्या काळातील कालाकारांच्या सूरांवर उपस्थित वेभान होऊन नाचत होते. 

गायक पापोन 'मोह मोह के धागे हे' सादर करत रसिकांची मनं जिंकली.  नंतर रोनकिनी गुप्ता मंचावर आली आणि दोघांनी एकत्र “छाव लगा” सादर केले व संध्याकाळ खऱ्या अर्थाने आल्हाददायक केली.

दुसऱ्या दिवशीच्या शेवटचे सादरीकरण हे बॉलीवूड संगीत महोत्सवाच्या दृष्टीने अतिशय खास ठरले. अमीत त्रिवेदीचा सोलो परफॉर्मन्स सुरू झाला, त्याने “पश्मीना धागो के संग”, “मांजा – काय पो छे”, “मुझे छोड दो मेरे हाल पे”, “नयन तरसे – देव डी”, “सवार लूं”, “इक कुडी” अशा एकेक सुंदर गाणी सादर केली. 

Web Title: The evening of colorful Bollywood music by the performances of these artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.