हर फोटो कुछ कहता है

By Admin | Published: April 7, 2017 02:17 AM2017-04-07T02:17:10+5:302017-04-07T02:17:10+5:30

प्रत्येक फोटो काढण्यामागे फोटोग्राफरचा एक विचार असतो.

Every photo says something | हर फोटो कुछ कहता है

हर फोटो कुछ कहता है

googlenewsNext


प्रत्येक फोटो काढण्यामागे फोटोग्राफरचा एक विचार असतो. मार्क बेनिंगटन या हॉलिवूडच्या छायाचित्रकाराने बॉलिवूड कलाकारांचे काही खास क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. या प्रत्येक फोटो मागील त्याचे विचारही त्याने मांडले आहेत.
दीपिका पादुकोण :
एका म्युझिक अल्बमचे शूटिंग फिल्म सिटीमध्ये सुरू होते. त्यावेळी नृत्याची रिहर्सल सुरू असताना हा क्षण मला टिपता आला. बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेची छटा यात दिसते आहे. दीपिकाची एनर्जी आणि कामाबद्दलची उत्सुकता पाहता असे वाटत होते की जणू तिची सहकलाकार तिला यशाचे शिखर दाखवत आहे.
रणबीर कपूर : रणबीर एक अ‍ॅड फिल्म शूट करत होता. साधारणत: 2011च्या होळीनंतर मी हा त्याचा फोटो काढला आहे. जेव्हा हा फोटो रणबीरने स्वत: पहिला तेव्हा तो त्याला खूप आवडला. मला सुद्धा या फोटोमध्ये रणबीरवर येणारा प्रकाश आणि त्याची सावली यांचा मेळ आवडला.
करीना कपूर : मी करीनाला भेटण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मग शेवटी अर्जुन कपूर माझ्या मदतीला धावून आला. त्याच्यामुळे माझे भेटणे पक्के झाले. करीना जेवढी पडद्यावर सुंदर दिसते तेवढीच किंवा त्याहून जास्त सुंदर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात दिसते.
नसिरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक: हा फोटो त्या दोघांबाबत बरेच काही सांगून जातो. हा फोटो मी त्यांची पृथ्वी थिएटरमध्ये रिहर्सल सुरू असताना काढला आहे. मला त्यांचे फोटो काढण्यापेक्षा त्यांच्याशी गप्पा मारायला जास्त आवडले.
शशी कपूर : ज्येष्ठ कलाकार शशी कपूर रोज संध्याकाळी पृथ्वी थिअटरच्या कॅफे परिसरात असतात. त्यांच्या फॅन्सला वयाची मर्यादा नाही. त्यांचे फॅन्स जेव्हा त्यांना भेटायला येतात आणि त्यांचे गाजलेले सवांद त्यांच्यासमोर सादर करतात तेव्हा ते शांतपणे बसून त्यांना ऐकतात आणि त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात. अशाच एक फॅन्ससोबतचा निरागस क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
अभय देओल: माझी आणि त्याची भेट त्याचा चित्रपट "जिंदगी ना मिलेगी दोबारा"च्या प्रोमो शूटच्या वेळेस झाली. मी या आधीही अभयला मुलाखत घेण्याच्या निमित्ताने भेटलो होतो. तिथे बाजूला प्रॉडक्शनचे काम सुरू होते तिथे आम्ही चहा प्यायला बसलो. तिथल्या कलाकारांशी अभय गप्पा मारत बसला असतानाचा क्षण मी कॅमेऱ्यात टिपला.
सोनाक्षी सिन्हा : माझे वडील अभिनेते असल्याने मी अभिनेत्री बनावे अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण मी खूप जाडी असल्यामुळे मी या गोष्टीचा कधी विचारदेखील केला नाही, असे सोनाक्षी सांगते. पण आज तिने चांगलेच यश कमावले आहे. तिचा एका तालमीच्यावेळी टिपलेला हा फोटो.
स्वरा भास्कर : तन्नू वेड्स मन्नु आणि रांजणा या चित्रपटाच्या यशाअगोदार स्वरा अंधेरी ते चर्चगेट ट्रेनमध्ये आपल्या स्क्रिप्टचा अभ्यास करत असताना टिपलेला हा क्षण.
राजकुमार राव: 2012 मध्ये वसोर्वा इथे शैतान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राजने घेतलेली ही उडी मी कॅमेऱ्यात बंदिस्त केली. राजकुमार रावला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती आणि ती पूर्णदेखील झाली.
रणवीर सिंग : या फोटो मागची एक रंजक गोष्ट आहे. मला रणवीरची मुलाखत आणि फोटो काढायचे होते म्हणून मी एका फिल्म अ‍ॅवॉर्डच्या वेळेस त्याच्या ड्रेसिंग रूमच्याबाहेर त्याची वाट पाहत जवळजवळ तासभर उभा होतो. रूममधून गाण्याचा आवाज येत होता आणि अचानक रुमचा दरवाजा उडला रणवीर बाहेर आला. मला काही कळण्याच्या आत तो तिथून धावत सुटला. मला वाटले आता मी इंटरव्ह्यु आणि फोटो दोन्ही मिस केले. मी पुढे जाणार तोवर मला त्याच्या अंगरक्षकांनी अडवले. एवढे सगळं घडत असताना रणवीर स्टेजवर पोहोचलासुद्धा. पण तेवढ्यात अंगरक्षक दुसरीकडे व्यग्र झाले आणि मी तिथून निसटलो. माझा कॅमेरा सेट केला तेवढ्यात रणवीर मेकअप करण्यासाठी स्टेजवरून खाली उतरला आणि मला संधी मिळाली. मी त्याचे तीन फोटो काढले त्यातलाच हा एक फोटो.

Web Title: Every photo says something

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.