प्रत्येकाच्या जीवनात असतो एक ‘साला खडूस’

By Admin | Published: January 29, 2016 02:36 AM2016-01-29T02:36:30+5:302016-01-29T02:36:30+5:30

‘साला खडूस’ या चित्रपटाचे नाव सध्या गाजत आहे. असे विचित्र नाव का ठेवण्यात आले याचीही चर्चा जोरात आहे. या चित्रपटाचे निर्माता राजकुमार हिरानी यांनी स्वत: यामागची सुरस कथा सांगितली.

Everybody lives in a 'fuck up Khados' | प्रत्येकाच्या जीवनात असतो एक ‘साला खडूस’

प्रत्येकाच्या जीवनात असतो एक ‘साला खडूस’

googlenewsNext

- राजकुमार हिरानी, रितिका सिंगच्या सीएनएक्सशी मनमोकळ्या गप्पा

‘साला खडूस’ या चित्रपटाचे नाव सध्या गाजत आहे. असे विचित्र नाव का ठेवण्यात आले याचीही चर्चा जोरात आहे. या चित्रपटाचे निर्माता राजकुमार हिरानी यांनी स्वत: यामागची सुरस कथा सांगितली. प्रत्येकाच्याच आयुष्यात एक ‘साला खडूस’ असतो, ज्याच्याबद्दल आपल्या मनात आदरयुक्त भीती असते. त्यालाच आम्ही पडद्यावर साकारल्याचे त्यांनी सांगितले. ‘साला खडूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकमत कार्यालयात आले असता त्यांनी आपल्या बॉलीवूड प्रवासाची माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत या चित्रपटाची नायिका रितिका सिंगही होती.

माधवन कोचच्या भूमिकेत
आर. माधवन याने या चित्रपटात एका बॉक्सिंग कोचची भूमिका वठविली आहे. नायिका रितिका सिंग त्याचा उल्लेख ‘साला खडूस’ म्हणून करीत असते. मात्र तो तिच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती ठरतो. ती त्याच्याशिवाय जगू शकत नाही. हा चित्रपट एक सामाजिक संदेश देणारा आहे. राष्ट्रीय स्तरावरील अ‍ॅथलेटिक्स जे यश संपादन करतात त्यांच्या मागे अशाच काही व्यक्तींची महत्त्वाची भूमिका असते. अशाच व्यक्तींना ‘साला खडूस’ म्हणण्यापेक्षा त्यांची क्षमा मागण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.

बॉक्सिंगची दुुनिया कॅ मेऱ्यात केली कैद
माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. सुधाने बॉक्सिंगवर चित्रपट तयार करण्यासाठी दोन वर्षे बॉक्सिंगचा अभ्यास केला. हा चित्रपट अनेक सत्य घटनांवर आधारित आहे, हे जरी फिक्शन वाटत असले तरी यामागे खरीखुरी माणसे आहेत. यातील शॉट्सही खरेच आहेत. म्हणूनच झोपडपट्टीतले शॉट्स खूप जिवंत वाटतात. शिवाय आमची नायिकादेखील खूप ग्लॅमरस नाही. बॉक्सिंग रिंगदेखील खरे आहेत. आमचा चित्रपट एका विषयाला स्पर्श करतो, हा विषय आहे सरकारी नोकरीचा... एका बॉक्सरने सांगितलेला.

मराठी चित्रपट अर्थपूर्ण
मराठी सिनेमाबद्दल आपले मत व्यक्त करताना राजकुमार हिरानी म्हणाले, मागील पाच वर्षांत मराठी सिनेमा बदलला आहे. मल्टिप्लेक्समध्ये त्यांनी जागा मिळविली आहे. मराठी सिनेमांची वेगळी दुनिया आहे. येथे अर्थपूर्ण चित्रपट तयार केले जातात. मराठी चित्रपटात जे पाहायला मिळते ते क्वचितच हिंदी सिनेमात दिसते. मी काही मराठी चित्रपट पाहिले आहेत ज्यांना हिंदीत कॉपी केले जात आहे. जाहिरातीपासून मी आपल्या करिअरची सुरुवात केली. मी येथे एक गोष्ट शिकलो ती म्हणजे येथे गतीला महत्त्व आहे. माझे अभिनेते मला लाइक करीत नसतील. कारण मी शूटिंग करताना दोन दृश्यांत बराच वेळ घेतो.

रीअल लाइफमध्येही बॉक्सर
अनेकांना या चित्रपटाच्या नायिकेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. रितिका आपल्या खऱ्या आयुष्यात बॉक्सर आहे. तिने यापूर्वी कधीही
अभिनय केलेला नाही. तिचीच या भूमिकेसाठी
निवड का केली यावर उत्तर देताना राजकुमार हिरानी म्हणाले, ही
माझी चॉइस नव्हती असे नाही. पण हा सुधाचा निर्णय होता. तिला या चित्रपटासाठी खरीखुरी बॉक्सर हवी होती. या चित्रपटात अनेक बॉक्सिंग सीन्स आहेत आणि ते सर्व खरे वाटायला हवेत, अशी तिची इच्छा होती. मी तिला तशी परवानगी दिल्यावर नायिकेचा शोध सुरू झाला. मॅडीने एका होर्डिंगवर रितिकाचा फोटो पाहिला. तिला आॅडिशनला बोलाविले, ती घाबरलेली होती. मात्र ती ऊर्जावान होती. अखेर तीच नायिका झाली.

होकार द्यावा की नकार हेच कळत नव्हते
हा चित्रपट स्वीकारावा असे का वाटले, असे विचारल्यावर रितिका म्हणाली, मला चित्रपटाच्या आॅफर येतील असा विचार कधीच केला नव्हता. मला वाटले या चित्रपटातील भूमिका लहान असेल. मात्र मॅडी सरांनी मला स्क्रिप्ट वाचून दाखविल्यावर ही क था खरोखरच चांगली आहे असे मला वाटले. मी होकार द्यावा की नकार हेच मला समजत नव्हते. मी फक्त एवढेच विचारले, शूटिंग कधीपासून सुरू होणार. मी ज्या वेळी कथा ऐकली होती तेव्हा १८ वर्षांची होते. चित्रपटाची सुरुवात झाली त्या वेळी २२ वर्षांचे व आता मी २४ वर्षांची आहे. बॉलीवूडमध्ये भविष्यातील योजना काय, या प्रश्नावर रितिका म्हणाली, जर चांगल्या आॅफर असतील तर त्या मी नक्की स्वीकारेन. मात्र माझी प्राथमिकता नेहमीच बॉक्सिंग राहील. रितिका तिच्या वडिलांसोबत मागील ३ वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. मला बॉक्सिंगची आवड आहे म्हणून मी हे करीत आहे. जीममधून कंटाळा आला असला तरी निरोगी राहण्यासाठी मला हे करावेच लागेल. खऱ्या आयुष्यातदेखील बॉक्सर होणे सोपे काम नव्हतेच. तुम्ही जेव्हा जॉ गार्ड घालता तेव्हा तुम्हाला डोक्याची हालचाल करता येत नाही. गम शिल्ड घातल्यावर तुम्हाला आपल्याच जागी स्थिर राहायचे आहे. अखेर तुमच्या डोळ्याजवळ प्रहार होतो. हा अभिनय नाही ते खरे असते.

Exclusive
meha.sharma@lokmat.com

Web Title: Everybody lives in a 'fuck up Khados'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.