उत्कृष्ट अॅक्शन; पण दुबळे कथानक

By Admin | Published: February 5, 2016 06:50 PM2016-02-05T18:50:37+5:302016-02-05T18:52:40+5:30

1990 च्या दशकात सनी देओलच्या करिअरला नवी दिशा देणारा चित्रपट म्हणून घायलकडे पाहिले जाते. घायलचा सिक्वल घेऊन सनी देओल परत आला आहे. दिग्दर्शकाची जबाबदारीही सनी

Excellent action; But the weak plot | उत्कृष्ट अॅक्शन; पण दुबळे कथानक

उत्कृष्ट अॅक्शन; पण दुबळे कथानक

googlenewsNext
>- अनुज अलंकार
 
चित्रपट समीक्षण : घायल वन्स अगेन 
रेटिंग : 1.5 स्टार 
 
1990 च्या दशकात सनी देओलच्या करिअरला नवी दिशा देणारा चित्रपट म्हणून घायलकडे पाहिले जाते. घायलचा सिक्वल घेऊन सनी देओल परत आला आहे. दिग्दर्शकाची जबाबदारीही सनी देओलनेच सांभाळली आहे; पण घायलसारखा चित्रपट बनविणो यावेळी जमले नाही. अर्थात घायलशी तुलना करता हा चित्रपट कसोटीला कुठेच उतरत नाही. 
कथानक यावेळीही अजय मेहराचेच (सनी देओल) आहे. जो तुरुंगातून बाहेर आलेला आहे आणि एका न्यूज एजन्सीचा संपादक बनतो. यावेळी संपादकाच्या भूमिकेतील अजय मेहरा व्यवस्थेतील काही प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवितो. समाजाच्या दुश्मनांविरुद्ध लढा उभारतो. त्यासाठी तरुणांची एक टीम त्याला साथ देण्यासाठी पुढे येते. या चित्रपटात अजयचा दुश्मन राज बन्सल (नरेंद्र झा) आहे. हा एक मोठा उद्योगपती आहे. मंत्री (मनोज जोशी) आणि वकील (सचिन खेडेकर) राज बन्सलला त्याच्या विघातक कारवायात साथ देतात. एवढेच काय पण अन्य एका वर्तमानपत्रचा संपादकही (हर्ष छाया) राज बन्सलला साथ देत आहे. हा संपादक एका महिला पत्रकारावर अत्याचार करतो आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करतो. येथूनच अजय मेहरा एक नवी लढाई सुरू करतो. 
 
उणिवा... 
सनी देओल दोन गोष्टी विसरलेले दिसतात. घायल हा 1990 चा चित्रपट आहे, तर याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलेले होते, ज्यांनी अनेक वर्षे या कथानकावर अभ्यास केला होता. हे सांगणो कठीण आहे की, इतक्या वर्षानंतर घायलचे यश इनकॅश करण्यासाठी सनी देओलने या सिक्वलचे दिग्दर्शन केले आहे का? अर्थात हे मात्र नक्की सांगता येईल की, सनी देओलचे दिग्दर्शन ही या चित्रपटाची मोठी उणी बाजू आहे. या काळातील तरुणांची बदलती आवड लक्षात घेणो किती गरजेचे आहे हे दिग्दर्शक म्हणून सनी देओल यांना लक्षात आले नाही. 1990 च्या काळातील शैलीतच हा चित्रपट बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, आजच्या काळाशी ते सुसंगत ठरत नाही. मसाला चित्रपटांचे दिवस आता तसे राहिलेले नाहीत, जे की 1990 च्या काळात होते, हे सनी देओल समजू शकलेले नाहीत. हिंदी चित्रपट आता वास्तवतेकडे अधिक झुकत आहे. 
सिक्वलच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सनी यांनी दुस:याला दिली असती तर चांगले झाले असते. तर, याचा परिणाम कदाचित वेगळा झाला असता. परफॉर्मन्सबाबत बोलायचे तर अजय मेहरा हाच पूर्ण चित्रपटाला व्यापून राहतो आणि सनी देओलवर त्यांच्या वयाचा प्रभाव दिसत आहे. पटकथेची लय अतिशय संथ वाटते. तर यात उणीवाही खूप आहेत. दुस:या भागात चित्रपट तसा चांगला वाटतो. अभिनेता म्हणून सनी तसा चांगलाच वाटतो. पण, दिग्दर्शक म्हणून नाही. सहकलाकारात सोहा अली आणि ओमपुरी (जे पहिल्या घायलमध्येही होते) प्रभावी वाटत नाहीत. मुख्य खलनायकाच्या भूमिकेत नरेंद्र झा ओव्हरअॅक्टिंगचे शिकार झाल्याचे वाटतात. टिस्का चोपडा, सचिन खेडेकर, हर्ष छाया, मनोज जोशी, शिवम पाटील, आंचल मंजुल, ऋषभ अरोडा, डायना खान, मुरली शर्मा, रमेश देव, नीना कुलकर्णी आणि जाकिर हुसेन यांचा अभिनय बरा आहे. चित्रपटाचे संगीत सामान्यच आहे. शंकर-एहसान-लाय यांची टीम प्रभावी वाटत नाही. 
 
जमेच्या बाजू...
सनी देओल यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, अॅक्शन चित्रपटात आजही ते लाजवाब आहेत. हॉलीवूडचे अॅक्शन मास्टर डॅन ब्रेडली यांनी अॅक्शनची बाजू उत्कृष्टपणो सांभाळली आहे. सनीचे फॅन या अॅक्शन पाहून नक्कीच खूश होतील. एकूणच काय तर घायलचा नवा अवतार पंजाब आणि अन्य काही ठिकाणी सनीच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरु शकतो. पण, चित्रपट म्हणून याच्या यशाबाबत साशंकता आहे.  
 
का पहावा? 
सनीच्या अॅक्शन सीनसाठी
 
का पाहू नये? 
दिग्दर्शक म्हणून सनी प्रभाव पाडू शकले नाहीत. कथानकही दुबळे आहे.

Web Title: Excellent action; But the weak plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.