Exclusive : अभिषेक बच्चन आहे या महाराष्ट्रीयन पदार्थाचा फॅन, रोज ठाण्याहून येते स्पेशल डिश

By तेजल गावडे | Published: April 22, 2022 08:45 PM2022-04-22T20:45:33+5:302022-04-22T20:46:03+5:30

Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात.

Exclusive: Abhishek Bachchan is a fan of Maharashtrian food, a special dish that comes from Thane every day | Exclusive : अभिषेक बच्चन आहे या महाराष्ट्रीयन पदार्थाचा फॅन, रोज ठाण्याहून येते स्पेशल डिश

Exclusive : अभिषेक बच्चन आहे या महाराष्ट्रीयन पदार्थाचा फॅन, रोज ठाण्याहून येते स्पेशल डिश

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)चा नुकताच 'दसवीं' (Dasvi) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने गंगाराम चौधरीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री निमरत कौर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत होती. लोकमतशी बोलताना अभिषेक बच्चनने त्याला महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडत असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर दररोज तो नाश्त्याला मिसळ खातो.

अभिषेक बच्चनने सांगितले की, मला मिसळ खूप आवडते. माझ्यासाठी दररोज ठाण्याहून मिसळ येते. मामलेदारची. हे हेल्दी फूड आहे. तसेच मला गावठी चिकन आवडते आणि ते आमच्या घरीदेखील बनवले जाते. इतकेच नाही तर मला मिरचीचा ठेचादेखील खूप आवडतो. थंडीच्या दिवसात माझा फ्रेंड हुरडादेखील आणतो. 

बरेच कलाकार फिट राहण्यासाठी एक्सरसाइज आणि डाएट करतात. याबद्दल अभिनेत्याला विचारले असता तो म्हणाला की, मी डाएट वगैरे करत नाही. पण जर भूमिकेसाठी मला वजन घटवावे लागले तर हे सगळे बंद करतो. मग त्यावेळी त्यासाठी जे गरजेचे आहे ते करतो.

आगामी प्रोजेक्ट

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने नुकतेच एका चित्रपटाचे शूटिंग केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे घूमर. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की करत आहेत.  तसेच त्याने वेबसीरिज ब्रीदचे पुढील सीझनचे शूटिंगदेखील पूर्ण केले आहे. याशिवाय अभिषेक बच्चनची निर्मिती असलेला चित्रपट ट्रिपल एस 7च्या पोस्ट प्रोडक्शनचे सध्या काम सुरू आहे. शूट पूर्ण झाले आहे आणि यात तोदेखील काम करताना दिसणार आहे.
 

Web Title: Exclusive: Abhishek Bachchan is a fan of Maharashtrian food, a special dish that comes from Thane every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.