Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

By तेजल गावडे | Published: April 5, 2022 06:33 PM2022-04-05T18:33:16+5:302022-04-05T18:34:04+5:30

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला.

Exclusive: Abhishek Bachchan praises Nagraj Manjule, says - 'His me ...' | Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

googlenewsNext

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित ‘झुंड’ रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. अगदी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान, साउथचा सुपरस्टार धनुषपासून मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांचे भरभरून कौतुक केले. दरम्यान, आता अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने लोकमतशी बोलताना 'झुंड' बनवणाऱ्या नागराज मंजुळे यांची पाठ थोपटली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.

अभिषेक बच्चनने 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. म्हणाला की, मी झुंड चित्रपट पाहिला आणि मला हा चित्रपट खूप आवडला. नागराज मंजुळेंचे काम मला खूप आवडले. ते खूपच चांगले कलाकार आहे आणि अद्भूत निर्माते आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात त्या मुलांनी जे काम केले आहे ते वाखाणण्याजोगे आहे.

अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट दसवी ७ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत निमरत कौर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनने गंगा राम चौधरीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल त्याने सांगितले की, दसवी हा खूपच मजेशीर, कमर्शिल आणि कौटुंबिक चित्रपट आहे. हा एण्टरटेनिंग चित्रपट आहे. यात कोणत्या समस्या किंवा मुद्द्यावर भाष्य करण्यात आलेले नाही. या चित्रपटाचा उद्देश फक्त लोकांचे मनोरंजन करणे इतकेच आहे. यासोबतच लोकांना संदेशही मिळणार आहे.

Web Title: Exclusive: Abhishek Bachchan praises Nagraj Manjule, says - 'His me ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.