या स्टार्सची केली शोमधून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 04:14 AM2017-04-14T04:14:02+5:302017-04-14T04:14:02+5:30

सध्या टीव्ही जगतात चर्चेचा विषय ठरत असलेली एके काळची ‘अंगुरी भाभी’ ऊर्फ शिल्पा शिंदे जबरदस्त वादाच्या भोवऱ्यात आहे. कारण तिने ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या

Extra from the show on the show | या स्टार्सची केली शोमधून हकालपट्टी

या स्टार्सची केली शोमधून हकालपट्टी

googlenewsNext

- Satish Dongare 

सध्या टीव्ही जगतात चर्चेचा विषय ठरत असलेली एके काळची ‘अंगुरी भाभी’ ऊर्फ शिल्पा शिंदे जबरदस्त वादाच्या भोवऱ्यात आहे. कारण तिने ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या निर्मात्यावरच सेक्शुअल हॅरासमेंटचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वास्तविक, शिल्पा आणि निर्मात्यांमध्ये वादाची ठिणगी वर्षभरापूर्वीच पडली होती, जेव्हा शिल्पाची शोमधून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासूनच निर्माते आणि तिच्यात धुसफूस सुरू आहे. सध्या हा वाद टोकाला पोहोचला असून, शिल्पाने केलेले आरोप गंभीर समजले जात आहेत. खरं तर शिल्पाची शोमधून केलेली हकालपट्टीच या सर्व वादाचे मूळ समजले जात आहे. शिल्पाप्रमाणे इतरही काही टीव्ही स्टार्स आहेत, ज्यांची शोमधून थेट हकालपट्टी केली आहे.

जिया माणिक
२५५‘गोपी बहू’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जिया माणिक हिने कित्येक वर्षे ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली. मात्र, जेव्हा ती एका चॅनलवरील रिअ‍ॅलिटी शोशी जोडली गेली, तेव्हा निर्मात्यांनी तिला काहीही कारण न देताच ‘साथ निभाना साथिया’मधून बाहेरचा रस्ता दाखविला. याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

करण सिंग ग्रोवर
अभिनेत्री बिपाशा बसूचा पती करण सिंग ग्रोवर याला आपल्या अन्प्रोफेशनल अ‍ॅटिट्यूडमुळे ‘दिल मिल गए’ मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मालिकेच्या शूटिंगदरम्यान बऱ्याचदा करण तब्येतीचे कारण देत सेटवर येत नव्हता. तसेच, निर्मात्यांना कुठल्याही सूचना न देताच हॉलिडेवर जात होता. करणच्या याच नखऱ्यांमुळे निर्मात्यांनी त्याची मालिकेतून हकालपट्टी केली होती.

सोनारिका भदौरिया
‘देवो के देव महादेव’ या धार्मिक मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून जबरदस्त प्रसिद्ध झालेली सोनारिका भदौरिया ही त्यावेळेस चर्चेत आली जेव्हा तिची शोमधून हकालपट्टी करण्यात आली होती. असे म्हटले जाते की, सोनारिका सेटवर जरा जास्तच नखरे करीत होती. लुक्स आणि तिच्या कॉस्ट्यूम्सवरून तिने प्रॉडक्शन हाउसला अक्षरश: सळो का पळो करून सोडले होते. अखेर निर्मात्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला. गेल्या वर्षी सोनारिकाने ‘सांसे’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला आहे.

दृष्टी धामी
‘झलक दिखला जा’ या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली दृष्टी धामी हिला २०१४मध्ये शोमधून बाहेर काढण्यात आले होते. दृष्टी या शोची होस्ट म्हणून काम करीत होती. परंतु, कामात अयशस्वी ठरल्याचे कारण देऊन तिला शोमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. दृष्टीच्या जागी मनीष पॉल याला संधी दिली गेली.

तनीषा मुखर्जी
‘बिग बॉस - ७’ नंतर तनीषा मुखर्जी ‘गॅँग्स आॅफ हंसीपूर’ या कॉमेडी शोमध्ये बघायला मिळाली. मात्र, प्रेक्षकांना हसविण्यात तनीषा अयशस्वी ठरल्याने तिला शोमधून बाहेर काढण्यात आले होते.

Web Title: Extra from the show on the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.