फेसबुकने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बनवलं अभिनेत्री

By Admin | Published: February 28, 2017 06:33 PM2017-02-28T18:33:35+5:302017-02-28T18:41:42+5:30

फेसबुकमुळे बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला अभिनेत्री बनण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियामुळे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आले.

Facebook created a 12th generation learnress | फेसबुकने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बनवलं अभिनेत्री

फेसबुकने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बनवलं अभिनेत्री

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - फेसबुकमुळे बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला अभिनेत्री बनण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियामुळे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आले. तरुणांकडून सर्वच सोशल नेटवर्किंग मीडियाचा वापर होतो. आजची तरूण पिढी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप पुढारलेली आहे. जवळपास सगळेच विद्यार्थी फेसबुक वापरात आहेत. फेसबुकबर आपण विविध पोस्ट, फोटो टाकत असतो. फेसबुकवर टाकलेल्या फोटोमुळे पारुल गुलाटीला 12 मध्ये शिकत असताना अभिनेत्री साठी विचारण्यात आले होते.

पंजाबी चित्रपटातील सध्याची आघाडीचा अभिनेत्री पारुल गुलाटीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतील तिला अभिनयाची संधी कशी मिळाली याबबतचा खुलासा केला. यावेळी बोलताना ती म्हणाली, अभिनय क्षेत्रात येण्याचा माझा विचार नव्हता. मी ज्यावेळी 12 मध्ये शिकत होते त्यावेळी एका मॉडिलिंग कंपनीने माझ्याशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करत जाहिरात करण्याची ऑफर दिली.

चित्रपटामध्ये यशस्वी होण्याचे क्रेडिट पारुल सोशल मीडियाला देते. ती म्हणते, इथे मला संधी सोशल मीडियामुळे मिळाली आहे. मी ज्यावेळी शिक्षणाबरोबर मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली त्यावेळी एका दिगदर्शकाने मला अभिनय क्षेत्रात काम का करत नाही असे विचारले. त्यानंतर मी अभिनय सुरु केला आणि तेव्हांपासून मी आजतागत काम करत आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी पारुलने लंडन येथिल रॉयल एकेडेमी मध्ये अभिनयाचे धडे घेतले आहेत.

Web Title: Facebook created a 12th generation learnress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.