बायको, गर्लफ्रेन्ड परवडायची नाही..., लग्नाच्या प्रश्नावर आमिरचा भाऊ फैजल खानचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 02:32 PM2021-08-25T14:32:48+5:302021-08-25T14:33:10+5:30
भाऊ आमिरसोबतचे संबंध, आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावरही दिली प्रतिक्रिया
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा भाऊ फैजल खान ( Faisal Khan) दीर्घकाळानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. ‘फॅक्टरी 3’ या सिनेमातून फैजल प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. फैजल हाच या सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि शिवाय मुख्य अभिनेताही तोच आहे. तूर्तास फैजल त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. आमिरसोबतचे संबंध, त्याचा घटस्फोट, शिवाय स्वत:चं लग्न अशा अनेक गोष्टींवर तो या मुलाखतीत बोलला.
फैजलने नुकतीच ई-टाईम्सला मुलाखत दिली. भाऊ आमिरसोबत बॉन्डिंग कसं आहे? असं विचारलं असता आमच्यात सर्व काही सुरळीत असल्याचं तो म्हणाला. आमिर आमच्या कुटुंबातील सर्वात फेमस व्यक्ती आहे. पण माझ्या या सिनेमानंतर मलाही लोक ओळखू लागतील. मी माझे निर्णय स्वत: घेतो. मी खूप मेहनतीने सिनेमा बनवला आहे. आता तो प्रेक्षकांना किती आवडतो, ते बघूच, असं तो म्हणाला.
दुस-या लग्नाचा काही प्लान आहे का?
दुस-या लग्नाचा काही प्लान आहे का? असा प्रश्न फैजलला यावेळी विचारला गेला. या प्रश्नावर त्यानं फारच मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘दुर्दैवाने माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत की मी बायकोची जबाबदारी उचलू शकेल. आजकाल तर गर्लफ्रेन्ड सांभाळणंच खूप महागात पडते आणि बायको तर अजूनच महागात पडते. माझा हा सिनेमा हिट झाला तर मात्र मी गर्लफ्रेन्डबद्दल विचार करू शकतो.’
आमिर व किरणचा घटस्फोट
फैजलला आमिर खान व किरण राव यांच्या घटस्फोटाबद्दल छेडलं असता, त्यानं यावर बोलणं टाळलं. मी यावर काहीही बोलू शकत नाही. माझं स्वत:चं लग्न टिकू शकलं नाही. मग दुस-याच्या पर्सनल लाईफबद्दल मी काय बोलणार? आमिर व किरण यांना काय चांगलं आणि काय वाईट, हे चांगल्याप्रकारे ठाऊक आहे, असं तो म्हणाला.
‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर 2000 मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण या चित्रपटाने फैजलला खरी ओळख दिली. अर्थात ही ओळख फैजलला फार काळ टिकवता आली नाही. तुम्हाला आठवत असेलच, आमिरच्या याच भावावर ‘मेंटल’ असल्याचा टॅग लावला गेला होता. 2007 मध्ये फैजल घरातून पळून गेल्याची खबर होती. काही दिवसानंतर तो सिजोफ्रीनिया नामक आजाराने पीडित असल्याची बातमी आली होती. केवळ इतकेच नाही तर आमिरने मला घरात कैद करून ठेवले आहे, असा आरोप करून फैजलने याकाळात खळबळ निर्माण केली होती. आमिर माझी संपत्ती हडपू इच्छितो, असेही त्याने म्हटले होते.