दुसऱ्या विवाहाची निरर्थक कथा

By Admin | Published: July 6, 2015 06:10 AM2015-07-06T06:10:18+5:302015-07-06T06:10:18+5:30

विवाहित जीवनाचे अनेक प्रश्न असतात़ वेळीच ते सुटले नाहीत तर घटस्फोटाची वेळ येते आणि घटस्फोट झाल्यानंतर येणारे एकाकीपण ही नवी समस्या समोर येते.

False story of another marriage | दुसऱ्या विवाहाची निरर्थक कथा

दुसऱ्या विवाहाची निरर्थक कथा

googlenewsNext

अनुज अलंकार

विवाहित जीवनाचे अनेक प्रश्न असतात़ वेळीच ते सुटले नाहीत तर घटस्फोटाची वेळ येते आणि घटस्फोट झाल्यानंतर येणारे एकाकीपण ही नवी समस्या समोर येते. या थीमवर बनविण्यात आलेल्या ‘सेकंड हँड हसबंड’ या चित्रपटाची कथा खरेतर चांगली होती, पण दिग्दर्शक व लेखक या जोडीला त्यातून उत्कृष्ट चित्रपट बनविता आला नाही.
चंदिगड येथील आलिशान हॉटेलचा मालक अजितसिंग (धर्मेंद्र), आपली पत्नी (रती अग्निहोत्री)सह राहत असतो. पण दारू व दुसऱ्या महिलांसोबत असणाऱ्या संबंधांमुळे पती-पत्नीत तणाव निर्माण होतो. हा तणाव वाढत अखेर घटस्फोटापर्यंत पोहोचतो. अजितच्या हॉटेलचा मॅनेजर राजबीर (जिप्पी गे्रवाल) आपल्याच आयुष्यातील समस्यांमुळे त्रस्त आहे. राजबीरचा आपली पत्नी नेहा (गीता बसरा) शी घटस्फोट झाला आहे. पण न्यायालयाच्या निकालानुसार राजबीरला नेहाला पोटगीच्या नावावर मोठी रक्कम द्यावी लागते. त्यामुळे तो मैत्रीण गुरप्रीत (टिना आहुजा)शी विवाह करू शकत नाही.
पोलीस इन्स्पेक्टरला (विजयराज) नेहाचे आकर्षण आहे, पण तिला तो आवडत नाही. विजयराजची पत्नी मरण पावली असून तो दुसऱ्या पत्नीच्या शोधात आहे. नेहाला अजित आवडतो, पण तो घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच आपल्या पत्नीकडे परत जातो. नेहाला हवा तसा जोडीदार मिळतो. राजबीर-गुरप्रीत यांचा मार्ग मोकळा होतो.
उणिवा - दिग्दर्शक समीप कांग यांच्याकडे या कथानकातून एक चांगला चित्रपट बनविण्याची संधी व मसाला दोन्हीही होते. पण दिग्दर्शक म्हणून ते या कथानकाला न्याय देऊ शकले नाहीत. परिणामी चित्रपट ढिसाळ व नीरस झाला. पंजाबी स्टाईल चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नात त्यांनी सर्व अतिवापरामुळे गुळगुळीत झालेले मसाले वापरले. चित्रपटाची कथा कमजोर झाली व बाकी कसर कलाकारांनी भरून काढली. चित्रपटाचा नायक जिप्पी ग्रेवाल प्रभावहीन आहे़ गीता बसराकडून अभिनयाची अपेक्षा नव्हतीच, पण ग्लॅमरमध्येही ती फेल गेली. टिना आहुजा या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या गोविंदाच्या मुलीने निराश केले. मुकेश तिवारीपासून संजय मिश्रा व रती अग्निहोत्रीपासून विजयराजपर्यंत, अलोकनाथ, रविकिशन या
सर्वांचीच कामे बेताची झाली आहेत. पंजाबी स्टाईल गाणी भरपूर आहेत, पण दर्जा नाही. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून समीप कांग फेल ठरले आहेत.

Web Title: False story of another marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.