फोटोतील मायलेकीच्या जोडीला ओळखलं का? आई आहे प्रसिद्ध निर्माती तर लेक आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:55 PM2023-02-28T16:55:50+5:302023-02-28T16:57:03+5:30

celebrity: सोशल मीडियावर सध्या मराठी कलाविश्वातील एका मायलेकीच्या जोडीचा फोटो व्हायरल होत आहे.

famous celebrity mother daughter photo viral on social media | फोटोतील मायलेकीच्या जोडीला ओळखलं का? आई आहे प्रसिद्ध निर्माती तर लेक आहे अभिनेत्री

फोटोतील मायलेकीच्या जोडीला ओळखलं का? आई आहे प्रसिद्ध निर्माती तर लेक आहे अभिनेत्री

googlenewsNext

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपडेट, जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. यात खासकरुन ही कलाकार मंडळी त्यांच्या बालपणीचे, शालेय जीवनातील वा कुटुंबासमवेतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच मायलेकींचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या मराठी कलाविश्वातील एका मायलेकीच्या जोडीचा फोटो व्हायरल होत आहे.  या फोटोमध्ये दिसणाऱ्या या दोघी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. यात आई प्रसिद्ध निर्माती असून लेक अभिनेत्री आहे. इतकंच नाही तर दिग्दर्शक, निर्माता केदार शिंदे (kedar shinde) यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आईच्या हातात एक चिमुकलं बाळ दिसत आहे. मात्र, हेच बाळ आता मोठं झालं असून मराठी कलाविश्वात आपलं नशीब आजमावत आहे. तर, आईनेदेखील मराठी सिनेविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. फोटोत दिसणारी ही मायलेकींची जोडी म्हणजे प्रसिद्ध निर्माती बेला शिंदे (Bela Shinde) आणि अभिनेत्री सना शिंदे (sana shinde) आहे. सनाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान, बेला शिंदे या मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध निर्मात्या आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसंच लवकरच त्यांची निर्मिती असलेला ‘महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची लेक सना शिंदे ही रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती यांची भूमिका साकारणार आहे.
 

Web Title: famous celebrity mother daughter photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.