सुप्रसिद्ध गायक, संगीतकार मा. हेमंत कुमार यांचा जन्मदिवस

By Admin | Published: June 16, 2016 12:03 PM2016-06-16T12:03:36+5:302016-06-16T12:04:20+5:30

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा अशी अनेक प्रसिद्ध गाणी गाणारे हेमंतकुमार यांचा आज वाढदिवस.

Famous singer, composer Ma. Hemant Kumar's birthday | सुप्रसिद्ध गायक, संगीतकार मा. हेमंत कुमार यांचा जन्मदिवस

सुप्रसिद्ध गायक, संगीतकार मा. हेमंत कुमार यांचा जन्मदिवस

googlenewsNext
style="text-align: justify;">मुंबई, दि. १६ -  प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता हेमंत कुमार यांचा आज (१६ जून) जन्मदिवस. हेमंत कुमार मुखोपाध्याय उर्फ मा. हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नाही, त्यांच्या कुटुंबीयांचाही संगीतक्षेत्राशी काही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गाण्यासाठी पात्र ठरले.
गायनात गती असणाऱ्या हेमंतदांना साहित्यक्षेत्रातही रस होता. १९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदांमधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन हेमंतदांचा चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यापैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले. 
स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी पूर्बोरंग ह्या बंगाली तर आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. त्यानंतर त्यांनी 'नागिन' चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आणि ती गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारही मिळाला. गायक म्हणून हेमंतदांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गायली. 
हेमंतदांनी मृणाल सेन दिग्दर्शित 'नील आकाशेर नीचे' ह्या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मीतीक्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपटकंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद, कोहरा, खामोशी ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारीदेखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
हेमंत कुमार यांनी अनेक मराठी गाणी गायली व तीही लोकप्रिय ठरली. ’हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ’गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, लता मंगेशकर ह्यांच्याबरोबरचे ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंतदांच्या लोकप्रिय मराठी गाण्यांची काही उदाहरणे आहेत. अशा या सर्जनशाली संगीतकाराचा १६ सप्टेंबर १९८९ साली निधन झाले. 
संकलन :- संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- इंटरनेट /  विकिपिडीया

Web Title: Famous singer, composer Ma. Hemant Kumar's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.