प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर स्मृतिदिन

By Admin | Published: October 25, 2016 09:07 AM2016-10-25T09:07:49+5:302016-10-25T09:07:49+5:30

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांचा आज (२५ ऑक्टोबर) स्मृतिदिन

Famous singer Pandit Dattatreya Vishnu Paluskar Memorial Day | प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर स्मृतिदिन

प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर स्मृतिदिन

>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २५ - हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक  पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांचा आज (२५ ऑक्टोबर) स्मृतिदिन. १८ मे १९२१ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्‍नीचे उषाताई. विनायकराव पटवर्धन हे पलुसकरांचे गायनगुरू होत.
 
अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द. वि. पलुसकर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुसकरांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती. २५ ऑक्टोबक १९५५ साली त्याचें निधन झाले. 
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Famous singer Pandit Dattatreya Vishnu Paluskar Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.