रुबीना दिलैकची अशी काय क्रेझ की चाहत्याने बनवली बाहुली, हुबेहुब दिसते तिच्यासारखी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 11:31 AM2021-02-22T11:31:49+5:302021-02-22T11:36:29+5:30
ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिची प्रत्येक अदा चाहत्यांठी खासच असते. त्यामुळेच की काय तिच्या एका जबरा फॅनने हुबेहुब रुबीनाप्रमाणे दिसणारी बाहुलीच बनवली आहे.
सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी फॅन्स कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीवरील प्रेमसुद्धा रसिक कधीच लपवू शकले नाहीत. म्हणून बिग बॉस १४ ची विजेत बनलेली रुबीना दिलैकने चाहत्यांची पसंती मिळवत विजेती बनली. तिची लोकप्रियता इतकी होती की, रुबीनाच बिग बॉस १४ विजेती बनावी अशी चाहत्यांची ईच्छा होती. सोशल मीडियावरही तिलाच सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत होते. अखेर ट्रॉफी रुबीनाने जिंकत रसिकांचीही मनं जिंकली आहेत.
ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिची प्रत्येक अदा चाहत्यांठी खासच असते. त्यामुळेच की काय तिच्या एका जबरा फॅनने हुबेहुब रुबीनाप्रमाणे दिसणारी बाहुलीच बनवली आहे. यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरंय, रुबीनासाठी त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने खास रुबीनाची बाहुली बनवत आपले प्रेम व्यक्त केले आहे. गेल्या तीन महिन्यापासून घरात बंदिस्त असल्यामुळे तिला चाहत्यांच्या प्रेमाचा अंदाजाही नसेल मात्र आता चाहत्यांचे हे मिळणारे प्रेम बघून नक्कीच ती भारावली असणार हे मात्र नक्की.
‘खूप खूप आभार. मी माझ्या सुंदर तिस-या डोळ्यासोबत (बिग बॉसची ट्रॉफी) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतेय. माझ्या फॅन्स आणि फॉलोअर्ससाठी हे इन्स्टंट इन्स्टा लाईव्ह करतेय. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मी बिग बॉस 14 ची विजेती बनू शकली. तुम्ही माझे स्वप्न सत्यात बदलले. यानंतर मी खास तुमच्यासाठी लाईव्ह येईल. बिग बॉस, कलर्स टीव्ही आणि सलमान खान यांचेही खूप खूप आभार...,’ असे रूबीना म्हणाली.
बिग बॉसच्या घरात रूबीनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेलेत, तेव्हा या कपलच्या वैवाहिक आयुष्यात फार काही ठीक नव्हते. अगदी दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यत पोहोचले होते. पण बिग बॉसच्या घरात एकत्र राहताना दोघांमधील मतभेद दूर झालेत. दोघांनाही नव्याने एकमेकांची, एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव झाली. रूबीना व अभिनवने घटस्फोटाचा विचार कधीच मनातून काढून टाकला आहे. आता तर दोघेही दुसºयांदा लग्न करण्याच्या विचारात आहेत.