‘फनरल’ मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:44 PM2021-11-12T14:44:09+5:302021-11-12T14:46:02+5:30

‘फनरल’ चित्रपटाच आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होतांना दिसतय.

Fanaral Marathi Movie set to shine at IFFI 2021 | ‘फनरल’ मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

‘फनरल’ मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

googlenewsNext

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गौरवल्या गेलेल्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या आगामी मराठी चित्रपटाची नामांकित ‘इफ्फी’ महोत्सवात ही वर्णी लागली आहे. गोव्यात होऊ घातलेल्या ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२१ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश असून ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने स्थान पटकावले आहे. याआधी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव, अंबरनाथ महोत्सव, राजस्थान चित्रपट महोत्सव या महोत्सवांमध्ये ‘फनरल’ चित्रपटाची निवड झाली होती. यातल्या अंबरनाथ आणि राजस्थान चित्रपट महोत्सवात चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत.

सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सद्यस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंत:र्मुख करेल असे निर्माते व लेखक रमेश दिघे सांगतात. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटले पाहिजे, हाच विचार करुन सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा विषय ‘फनरल’ चित्रपटात मांडल्याचे दिग्दर्शक विवेक दुबे सांगतात’. आरोह वेलणकर, विजय केंकरे, प्रेमा साखरदांडे, संभाजी भगत आदि मान्यवर कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच ‘फनरल’ चित्रपटाच आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होतांना दिसतय.

Web Title: Fanaral Marathi Movie set to shine at IFFI 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.