दयाबेनच्या 'त्या' फोटोवर संतापले चाहते, म्हणाले- आमच्या भावनांशी खेळू नकोस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 06:33 PM2020-11-05T18:33:13+5:302020-11-05T18:33:44+5:30

दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये कधी परतणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

Fans angry over 'that' photo of Dayaben, said- don't play with our feelings | दयाबेनच्या 'त्या' फोटोवर संतापले चाहते, म्हणाले- आमच्या भावनांशी खेळू नकोस

दयाबेनच्या 'त्या' फोटोवर संतापले चाहते, म्हणाले- आमच्या भावनांशी खेळू नकोस

googlenewsNext

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने प्रेग्नेंसीमुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्याला आता बराच काळ उलटला असून ती मालिकेत कधी परतणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतेच मालिकेने ३००० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने दिशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मालिकेतील काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो पाहून काही चाहत्यांनी संताप व्यक्त केला. असे फोटो दाखवून आमच्या भावनांशी खेळू नकोस? अशी सक्त ताकिद त्यांनी दिशाला दिली आहे.


तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दयाबेन लवकरच कमबॅक करणार आहे, अशी वारंवार चर्चा ऐकायला मिळते. तिच्या पुनरागमनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. इतकेच नाही तर मालिकेतील प्रत्येक कलाकाराला हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र अद्याप कोणीही याचे ठाम उत्तर दिलेले नाही. त्यामुळे मालिकेचे काही चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यातच दिशा गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. या फोटोंमुळे चाहते आणखी संतापले अन् त्यांनी कृपया आमच्या भावनांशी अशी खेळू नकोस असा इशारा दिला आहे.


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

२८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १२ वर्ष ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Web Title: Fans angry over 'that' photo of Dayaben, said- don't play with our feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.